Chardham Yatra: चारधाम यात्रेकरूंना आता मिळणार 'ट्रॅव्हल किट'! दुर्गम भागात दुर्गंधीमुक्त 'वॉटरलेस यूरिनल'ची सोय; सरकारचा मोठा निर्णय!
esakal April 19, 2026 06:45 PM

उत्तराखंडमधील चारधाम यात्रा २०२६ आता अधिक हाय-टेक आणि सोयीस्कर होणार आहे. यात्रेकरूंची वाढती संख्या लक्षात घेऊन परिवहन विभागाने पहिल्यांदाच काही क्रांतिकारी पावले उचलली आहेत. यामध्ये दुर्गम भागात दुर्गंधीमुक्त स्वच्छतागृहे आणि प्रवाशांना 'ट्रॅव्हल किट' देण्याचा समावेश आहे.

Mumbai Pune Expressway: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ सज्ज; एक मेपासून मार्ग खुला होणार, बोगद्यांत ‘एआय’ सुरक्षाप्रणाली..

परिवहन विभागाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, यात्रेकरूंचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी अनेक नवीन सुविधांची अंमलबजावणी केली जात आहे.

काय असेल या 'ट्रॅव्हल किट'मध्ये?

परिवहन विभाग पहिल्यांदाच प्रवाशांना एक उपयुक्त कीट देणार आहे. या किटमध्ये प्रवासादरम्यान लागणाऱ्या ५ महत्त्वाच्या वस्तू असतील:

१. ओमेटींग बॅग (Vomiting Bag): डोंगराळ भागात मळमळ किंवा उलट्यांचा त्रास झाल्यास याचा वापर करता येईल.

२. यूरिनल बॅग: तातडीच्या वेळी वापरण्यासाठी विशेष बॅग.

३. सॅनिटायझर: स्वच्छतेसाठी.

४. वेट वाइप्स (Wet Wipes): चेहरा किंवा हात पुसण्यासाठी.

५. कचरा पिशवी: वाहनातील कचरा रस्त्यावर न टाकता या छोट्या बॅगमध्ये जमा करता येईल.

ही किट चेकपोस्टवर वाहनातील प्रवाशांच्या संख्येनुसार मोफत दिली जाईल.

वॉटरलेस यूरिनल: दुर्गंधीपासून सुटका

डोंगराळ भागात पाण्याचा तुटवडा असतो, त्यामुळे स्वच्छतागृहात दुर्गंधी पसरते. यावर उपाय म्हणून रेल्वेतील बायोटॉयलेटच्या धर्तीवर 'वॉटरलेस यूरिनल' लावले जाणार आहेत. यामध्ये मूत्रामधून पाणी आणि युरिया वेगळे केले जाते, ज्यामुळे दुर्गंधी येत नाही आणि परिसर स्वच्छ राहतो. सध्या सुरुवातीला ७ युनिट्स मागवण्यात आले आहेत.

नारसन चेकपोस्टवर 'वेटिंग रूम'

प्रवाशांना 'ग्रीन कार्ड' काढण्यासाठी तासनतास थांबावे लागते. आता नारसन चेकपोस्टवर प्रवाशांसाठी प्रशस्त वेटिंग रूम बनवली जाईल. येथे प्रवाशांसाठी कुलर, हाय-स्पीड इंटरनेट आणि मनोरंजनासाठी एलईडी टीव्हीची सोय असेल.

Pune Education News: उन्हाळी सुट्टीतच शिक्षकांना प्रशिक्षण बंधनकारक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचा निर्णय; ४ मेपासून हाेणार सुरुवात! सुरक्षेसाठी विशेष पथके

यात्रेच्या मार्गावर वाहतुकीचे नियम पाळले जावेत आणि प्रवाशांना मदत मिळावी यासाठी ९ फिरती पथके (Sachal Dal) तैनात करण्यात आली आहेत. तसेच डेहराडून आणि सोनप्रयाग येथे विशेष अस्थायी चेकपोस्ट तयार करण्यात आले आहेत.

परिवहन विभागाच्या या उपक्रमामुळे चारधाम यात्रेत स्वच्छतेचा दर्जा सुधारेल आणि प्रवाशांना होणारा त्रास कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.