क्रिकेट चाहत्यांना आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात शनिवारी 17 एप्रिलला डबल हेडरचा थरार अनुभवायला मिळणार आहे. या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स भिडणार आहेत. दिल्लीचा हा या हंगामातील पाचवा तर आरसीबीचा सहावा सामना असणार आहे. रजत पाटीदार आरसीबीचं नेतृत्व करणार आहे. अक्षर पटेल याच्या खांद्यावर दिल्ली कॅपिट्ल्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. दिल्लीसमोर या सामन्यात पराभवाची हॅट्रिक टाळण्यासह गतविजेच्या आरसीबीला रोखण्याचं दुहेरी आव्हान असणार आहे. या सामन्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.