क्रिकेट चाहत्यांना आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) शनिवारी 17 एप्रिलला डबल हेडरचा थरार अनुभवायला मिळणार आहे. या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स भिडणार आहेत. दिल्लीचा हा या हंगामातील पाचवा तर आरसीबीचा सहावा सामना असणार आहे. रजत पाटीदार आरसीबीचं नेतृत्व करणार आहे. अक्षर पटेल याच्या खांद्यावर दिल्ली कॅपिट्ल्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. दिल्लीसमोर या सामन्यात पराभवाची हॅट्रिक टाळण्यासह गतविजेच्या आरसीबीला रोखण्याचं दुहेरी आव्हान असणार आहे. त्यामुळे दिल्ली आरसीबीला रोखण्यात यशस्वी ठरणार की गतविजेता विजयी घोडदौड कायम राखणार? याचे चाहत्यांना वेध लागले आहेत. यानिमित्ताने उभयसंघातील सामन्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
आरसीबी विरुद्ध दिल्ली सामना कधी?आरसीबी विरुद्ध दिल्ली सामना शनिवारी 18 एप्रिलला खेळवण्यात येणार आहे.
आरसीबी विरुद्ध दिल्ली सामना कुठे?आरसीबी विरुद्ध दिल्ली सामना बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणार आहे.
आरसीबी विरुद्ध दिल्ली सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?आरसीबी विरुद्ध दिल्ली सामन्याला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 3 वाजता टॉस होणार आहे.
आरसीबी विरुद्ध दिल्ली सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?आरसीबी विरुद्ध दिल्ली सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तसेच लाईव्ह मॅच मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे पाहायला मिळेल.
दोन्ही संघांची 19 व्या मोसमातील आतापर्यंतची कामगिरीआरसीबीने आतापर्यंत 5 पैकी 4 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. आरसीबी 8 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. आरसीबीने चेन्नई आणि हैदराबादला पराभूत केलं. त्यानंतर राजस्थानने आरसीबीला विजयी हॅट्रिकपासून रोखलं. त्यानंतर आरसीबीने मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्सवर विजय मिळवलाय.
तसेच दिल्लीने 4 पैकी 2 सामन्यांमध्ये विजय मिळवला. तर दिल्लीला तितक्याच सामन्यांत पराभूत व्हावं लागलंय. दिल्ली 4 गुणांसह सहाव्या स्थानी आहे. दिल्लीने लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्सला पराभूत करत मोहिमेतील सलग 2 सामने जिंकले. मात्र त्यानंतर दिल्लीला गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्सकडून पराभूत व्हाव लागलं.
दिल्ली-आरसीबी हेड टु हेड रेकॉर्ड्सदरम्यान दिल्ली-आरसीबी आतापर्यंत एकूण 33 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यापैकी आरसीबीने सर्वाधिक 19 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर दिल्लीने 12 वेळा आरसीबीला पराभवाची धुळ चारली आहे.