रिलीजपूर्वीच स्टार प्रवाहच्या 'या' मालिकेचा हिंदी रिमेक ! प्रोमो हुबेहूब पण भलत्याच चॅनेलवर होणार प्रसारित
esakal April 18, 2026 03:45 PM

Marathi Entertainment News : मराठी मालिकाविश्वात सध्या अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. लवकरच स्टार प्रवाहवर बाई तुझा आशीर्वाद ही नवीन मालिका सुरु होणार आहे. 27 एप्रिलला या मालिकेचा पहिला भाग प्रसारित होईल. पण मालिकेच्या रिलीजपूर्वीच या मालिकेच्या हिंदी रिमेकची घोषणा करण्यात आली.

बरेली के बच्चन या नावाने बाई तुझा आशीर्वाद मालिकेचा रिमेक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच हिंदी प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. विशेष म्हणजे बाई तुझा आशीर्वाद मालिकेचा प्रोमो आणि या हिंदी मालिकेचा प्रोमो अगदी सारखे आहेत.

View this post on Instagram

A post shared by Actor_vk_yadav (@actor_vk_yadav)