Akola Crime News: अकोल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. गायकवाड यांच्यावर खंडणीचा गुन्हा (Crime News) दाखल झाल्यानंतर सरकारनं मोठी कारवाई केलीय. गुन्हा दाखल झाल्यानंतर गायकवाड यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं. खाण आणि स्टोन क्रशर मालकांना खंडणी (Extortion Case) मागण्याच्या आरोपावरून अकोल्यातील (Akola Crime News) एमआयडीसी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, 15 हजारांची लाच घेणं अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांना भोवलं असून या प्रकरणी त्यांचं निलंबन करण्यात आलं आहे.
Akola Crime News: 15 हजारांची मागणी केल्याचा आणि धमकावल्याचा खाणमालकांचा आरोप, प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ
अकोल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांनी खाणमालकांना प्रत्येकी 15 हजारांची मागणी केल्याचा आणि धमकावल्याचा खाणमालकांचा आरोप होता. त्यावरून दोन आठवड्यापूर्वी खाण आणि क्रशर मालकांनी एमआयडीसी पोलिसांमध्ये तक्रार केली होती. या तक्रारीवरून अतिरिक्त जिल्हाधिकारी गायकवाड यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर अखेर निलंबन झाल्याने जिल्ह्यातील प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. निलंबन काळात गायकवाड यांचं अकोला जिल्हाधिकारी कार्यालय मुख्यालय असेल. तर पूर्वसूचने शिवाय अकोला मुख्यालय न सोडण्याचे गायकवाड यांना शासनाने आदेश दिला आहे.
Raigad Accident News: पनवेलवरून गावी उत्तर कार्यासाठी निघालेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू; पत्नी देखील गंभीर जखमी...
रायगडच्या श्रीवर्धन मधील आरावी गावाकडे पनवेल वरून गावी येण्यासाठी निघालेल्या एका तरुणाचा रस्त्यातच अपघाती मृत्यू झालाय. आपल्या गावी भावाच्या उत्तर कार्यासाठी येत असताना म्हसळा शहराजवळच्या जांभूळ गावाजवळ येताच वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन थेट आंब्याच्या झाडावर आदळल आणि हा अपघात झाला.या अपघातात नरेश जनार्दन पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नी राजेश्री पाटील या देखील गंभीर जखमी झाल्या आहेत.जखमी महिलेवर म्हसळा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत्यू पावलेल्या नरेश पाटील यांच्या मुलाच गावी येत्या 30 एप्रिल रोजी लग्न देखील होत मात्र पाटील यांच्या अपघातामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या