गराडे, ता. १८ : श्री क्षेत्र कोडीत (ता. पुरंदर) येथे श्रीनाथ म्हस्कोबा यांच्या पुन:प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमानिमित्त १९ एप्रिलपासून विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. यात ब्रह्मकलशोत्सव, महायज्ञ, अखंड हरिनाम सप्ताह व कीर्तन महोत्सव आदी कार्यक्रम होणार आहेत
श्रीनाथ म्हस्कोबा प्राणप्रतिष्ठापना आणि मंदिराच्या सुवर्ण कलशाला १२१ नद्यांच्या पाण्याने अभिषेक करून या सोहळ्यास प्रारंभ होईल. १ मे रोजी महापूर्णाहुती आणि महामंगल आरती करून या सोहळ्याची सांगता होईल, असे देवनाथ म्हस्कोबा महाराज ट्रस्टतर्फे सांगण्यात आले. यावेळी ट्रस्टचे सर्व विश्वस्त उपस्थित होते.
श्रीनाथ म्हस्कोबा कोडीत डॉट. ऑर्ग वेबसाईटच्या उद्घाटनप्रसंगी संदीप बडदे यांनी ५२ हजार रुपये ऑनलाइन देणगी दिली.
महायज्ञ सोहळ्यात चार वेदांचे पारायण केले जाईल, सहस्त्रचंडी यज्ञ, अतिरुद्र स्वाहाकार, लक्षमोदकहवन गणेशयाग, विष्णूयाग, सुदर्शनयाग, शिव पंचायतन, होम, यज्ञ आणि शिवपार्वती विवाह सोहळा यांचे आयोजन केले आहे.