Praful Hinge 20th over bowling comeback IPL match: विदर्भच्या प्रफुल हिंगेला २०वे षटक देण्याचा कर्णधार इशान किशनचा डाव फसला असता तर... कारण सनरायझर्स हैदराबादच्या या गोलंदाजाने ३ षटकांत ५३ धावा दिल्या होत्या आणि चेन्नई सुपर किंग्सला ६ चेंडूंत १८ धावा करायच्या होत्या. तरीही इशानने त्याच्यावर विश्वास दाखवला आणि त्याने तो सार्थ ठरवताना SRH ला १० धावांनी विजय मिळवून दिला. या विजयासह हैदराबादचा संघ गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. हा रोमहर्षक विजय पाहून SRH ची मालकिण काव्या मारन ( Kavya Maran) हिलाही तिचा आनंद रोखता आला नाही आणि तिच्या सैराट सेलिब्रेशनने सर्वांचे लक्ष वेधले.
चेन्नईला २०२० नंतर १८० हून अधिक धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करता आलेला नाही आणि आज ते हा कटू इतिहास पुसतील असे वाटले होते. पण, प्रफुल हिंगेने अप्रतिम गोलंदाजी केली आणि २० व्या षटकात फक्त ८ धावा देत चेन्नईला १८४ धावांवरच रोखले. चेन्नईसाठी आयुष म्हात्रे ( ३०), मॅथ्यू शॉर्ट ( ३४), सर्फराज खान ( २५) व शिवम दुबे ( २१) यांनी चांगला खेळ केला. पण, हैदराबादच्या इशान मलिंगाने तीन, नितीश कुमार रेड्डीने दोन विकेट्स घेतल्या. प्रफुल, साकिब हुसैन व शिवांग कुमार यांनी प्रत्येकी एक, पण महत्त्वाची विकेट घेतली.
IPL 2026: आश्चर्यच... ना विराट, ना शुभमन Orange Cap तिसऱ्याच कुणाकडे; Purple Capवर चेन्नईच्या गोलंदाजाने निर्विवाद वर्चस्वतत्पूर्वी, चेन्नईच्या गोलंदाजांनाही सुरेख मारा केला होता आणि हैदराबादला संभाव्य २२५ धावांवरून १९४ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. अभिषेक शर्माने २२ चेंडूंत ५९ धावांची वादळी खेळी केली. हेनरिच क्लासननेही ५९ धावा चोपल्या, तर ट्रॅव्हिस हेडने २३ धावांचे योगदान दिले. पण, चेन्नईच्या अंशुल कंबोज व जेमी ओव्हरटन यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. मुकेश चौधरीने दोन चेंडूंत दिलेले दोन धक्के हैदराबादच्या कायम लक्षात राहतील.
शेवटच्या पाच षटकांचा थरार...चेन्नईला विजयासाठी ३० चेंडूंत ५४ धावांची गरज होती आणि मॅथ्यू शॉर्ट व शिवम दुबे ही सेट जोडी मैदानावर उभी होती. पण, इशान मलिंगाने १६व्या षटकात शॉर्टला ( ३४) बाद केले आणि दुबेवर दडपण वाढले. मलिंगाच्या त्या षटकात ८ धावाच आल्या. त्यानंतर १७व्या षटकात साकिब हुसैनने ६ धावा देताना दुबेचा ( २१) भन्नाट चेंडूवर त्रिफळा उडवला. आता सामना हैदराबादच्या बाजूने झुकू लागला होता. मलिंगाने टाकलेल्या १८व्या षटकात १० धावा आल्याने मॅच १२ चेंडू ३० धावा अशी जवळ आली.
नितीश कुमारने १९ व्या षटकात १२ धावा दिल्या आणि ६ चेंडू १८ धावा असा सामना जीवंत होता. नितीशने ४-०-३१-३ अशी स्पेल संपवली. शेवटचं षटक टाकण्यासाठी इशानकडे प्रुफल हिंगे व शिवांग कुमार हे दोनच पर्याय होते. शिवांगने ३ षटकांत १८ धावा देत १ विकेट घेतली होती. तर प्रफुलने ३ षटकांत ५३ धावा दिल्या होत्या. तरीही इशानने प्रफुलला चेंडू दिले आणि त्याने कमाल करून दाखवली.