Health Benefits: उन्हाळ्यात जांभूळ खाण्याचे फायदे
Marathi April 19, 2026 04:25 PM

उन्हाळा सुरु झाला की बाजारात कैरी, कलिंगड, करवंद, जांभूळ ही फळं विक्रीसाठी यायला सुरुवात होते. आपण सर्व जण कैरी, कलिंगड ही फळे आवर्जून विकत घेऊन खातो मात्र अनेकदा जांभळांकडे दुर्लक्ष केले जाते. परंतु, तुम्हाला माहित आहे का? उन्हाळ्यात जांभूळ खाण्याचे अनेक फायदे आहेत. (Jamun benefits for health)

जांभूळ हे एक स्वादिष्ट फळं आहे. त्याच्या चवीसह ते आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर मानले जाते. तसेच काही आरोग्यासंबंधित आजारांची जोखिम जांभूळ कमी करते. यामध्ये कॅल्शिअम, लोह, मॅग्नेशियम, फायबर, फॉस्फोरोस सारखे पोषक तत्व असतात. याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. त्यामुळे तुम्ही काही आजारांपासून दूर रहाता. आयुर्वेदानुसार जांभळाची पान, साल किंवा त्याच्या बियांत काही गुण असतात. त्यामुळे आरोग्यासंबंधित समस्या दूर होऊ शकतात. तर जाणून घेऊयात जांभूळ खाण्याचे फायदे.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी बेस्ट
जांभूळ असे एक फळं आहे ज्याचे सेवन मधुमेह असलेला रुग्ण करु शकतो. याच्या बियांमध्ये जंबोलाना नावाचे एक तत्व असते. जे शुगरचा स्तर नियंत्रित करण्यास मदत करतो. या फाळाचा ग्लाइसेमिक इंडेक्स ही फाक कमी असतो.

उच्च रक्तदाब नियंत्रित राहते
जांभूळ खाल्ल्याने उच्चरक्तदाब नियंत्रित राहतो. त्यामुळे ब्लड प्रेशर असलेल्या रुग्णांना ते खाण्याचा सल्ला दिला जातो. यामध्ये पोटॅशिअमचे प्रमाण अधिक असते. जे ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास फार फायदेशीर असते.

वजन कमी करण्यास फायदेशीर
जांभूळमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते. तसेच कमी कॅलरी ही असतात. तुमचे पोट भरलेले ठेवण्यासह वजन कमी करण्यास मदत होऊ शकते. या व्यतिरिक्त पाचन क्रिया ही सुरळीत राहते. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर जांभूळ नक्की खा.

ग्लोइंग त्वचेसाठी
जांभळात विटामिन्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामध्ये विटामिन-ए, लोह आणि अँन्टीऑक्सिटेंड गुण असतात. जे तुम्हाला वेळेआधी दिसणाऱ्या वृद्धपणाची समस्या दूर करतात. डोळ्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा जांभूळ फार फायदेशीर असते. पिंपल्स, सुरकुत्या , डाग हे सुद्धा दूर राहतात.

हिमग्लोबिन वाढते
जांभळामुळे विटामिन सी आणि लोह भरपूर प्रमाणात शरिराला मिळते. हे पोषक तत्व शरिरात हिमग्लोबिन वाढवण्यास मदत करते. हिमग्लोबिनचा स्तर वाढल्यास तुम्ही फिट राहता.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.