मुंबई : देशभरात आज अक्षय्य तृतीयेचा सण (Gold Price Akshaya Tritiya) मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून या दिवशी सोने खरेदी करण्याला विशेष महत्त्व असते. त्यामुळे बाजारात हालचाल वाढली असली तरी 19 एप्रिल रोजी सोने-चांदीच्या दरात मोठा बदल दिसून आलेला नाही. सोने अजूनही 1.5 लाख रुपयांच्या वरच व्यवहार करत आहे. (Gold Price Akshaya Tritiya)
आज 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याच्या दरात किरकोळ चढ-उतार दिसून येत आहे. सणाच्या पार्श्वभूमीवर खरेदी वाढण्याची शक्यता असतानाही दर स्थिर असल्याचे चित्र आहे.(Gold Price Akshaya Tritiya)
गेल्या आठवड्याचा विचार केला असता, सोने आणि चांदी या दोन्हींच्या किंमतीत वाढ झाली आहे. 17 एप्रिल रोजी MCX वर सोने 1,54,650 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 2,58,079 रुपये प्रति किलो दराने बंद झाली होती. तर 10 एप्रिल रोजी सोने 1,52,690 रुपये आणि चांदी 2,43,300 रुपये होती. म्हणजेच आठवडाभरात सोन्यात सुमारे 1,690 रुपयांची तर चांदीत 14,779 रुपयांची वाढ झाली आहे.(Gold Price Akshaya Tritiya)
दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे 10 ग्रॅम चांदीचा दर सुमारे 2,750 रुपये असून 100 ग्रॅमसाठी 27,500 रुपये मोजावे लागत आहेत. चेन्नईमध्ये 10 ग्रॅम चांदीचा दर 2,800 रुपये आहे.
दिल्ली:
24 कॅरेट – 1,55,930 रुपये
22 कॅरेट – 1,42,950 रुपये
18 कॅरेट – 1,16,990 रुपये
मुंबई :
24 कॅरेट – 1,55,780 रुपये
22 कॅरेट – 1,42,800 रुपये
18 कॅरेट – 1,16,840 रुपये
चेन्नई:
24 कॅरेट – 1,56,660 रुपये
22 कॅरेट – 1,43,600 रुपये
18 कॅरेट – 1,19,800 रुपये
कोलकाता:
24 कॅरेट – 1,55,780 रुपये
22 कॅरेट – 1,42,800 रुपये
18 कॅरेट – 1,16,840 रुपये
अहमदाबाद:
24 कॅरेट – 1,55,830 रुपये
22 कॅरेट – 1,42,850 रुपये
18 कॅरेट – 1,16,890 रुपये
लखनौ:
24 कॅरेट – 1,55,930 रुपये
22 कॅरेट – 1,42,950 रुपये
18 कॅरेट – 1,16,990 रुपये
पाटणा:
24 कॅरेट – 1,55,830 रुपये
22 कॅरेट – 1,42,850 रुपये
18 कॅरेट – 1,16,890 रुपये
हैदराबाद:
24 कॅरेट – 1,55,780 रुपये
22 कॅरेट – 1,42,800 रुपये
18 कॅरेट – 1,16,840 रुपये
दरम्यान, तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचाली, डॉलरमधील चढ-उतार आणि सणासुदीची वाढती मागणी यामुळे सोने-चांदीच्या दरात बदल होत राहतात. त्यामुळे गुंतवणूक किंवा खरेदी करण्यापूर्वी बाजारातील स्थितीचा आढावा घेणे गरजेचे आहे.
अक्षय्य तृतीया म्हणजे सुख-समृद्धी आणि अक्षय फळ देणारा दिवस मानला जातो. उद्या (रविवार, १९ एप्रिल २०२६ रोजी) हा सण साजरा होत आहे. या दिवशी सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते, त्यामुळे सोने चांदी बाजारात मोठी गर्दी दिसून येते. मात्र, गर्दीच्या दिवशी, घाईघाईत किंवा भावनेच्या भरात सोने खरेदी करताना ग्राहकांकडून काही गंभीर चुका होतात. तुमचे कष्टाचे पैसे योग्य ठिकाणी गुंतवले जावेत यासाठी या ५ गोष्टी लक्षात ठेवा.
तुम्ही भविष्यात गरजेला उपयोगी म्हणून सोने घेत असाल, तर मोठे दागिने घेणे टाळा. त्यापेक्क्षा २४ कॅरेटची सोन्याची नाणी, वेढे किंवा ‘सोव्हरन गोल्ड बाँड्स’ घ्या, गुंतवणूक म्हणून हा उत्तम पर्याय आहे.
नेहमी ‘बीएआयस हॉलमार्क’ असलेलेच दागिने खरेदी करा. दागिन्यांवर ‘एचयूआयडी’ क्रमांक असल्याची खात्री करा. यामुळे तुमच्या सोन्याची पूर्ण माहिती सरकारकडे नोंद होते. त्याचबरोबर घेताना कॅरेट देखील चेक करा.
अनेक ज्वेलर्स ‘झीरो मेकिंग चार्जेस’च्या किंवा इतके-इतके टक्के मजुरीवर सुट अशा जाहिराती करतात. अशा वेळी सोन्याचा प्रति ग्रॅम दर तपासा किंवा ‘वेस्टेज चार्जेस’ (तूट) जास्त लावले जात नाहीत ना याची खात्री करा.
सोने परत विकताना वा बदलून घेताना किती पैसे कमी होतील, हे विचारून घ्या. नामांकित ज्वेलर्स त्यांच्याकडून घेतलेल्या सोन्यावर चांगला परतावा देतात.
अक्षय्य तृतीया आहे म्हणून जास्तीत जास्त सोने खरेदी करू नका. तज्ज्ञांच्या मते, तुमच्या एकूण गुंतवणुकीच्या केवळ १० ते १५ टक्के रक्कम सोन्यात असावी.