मोहोळ: सोलापूर लोकसभा मतदार संघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले असून, उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उजनी प्रकल्प कालवा सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष सुलेमान तांबोळी यांनी दिली.
Pune Education News: उन्हाळी सुट्टीतच शिक्षकांना प्रशिक्षण बंधनकारक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचा निर्णय; ४ मेपासून हाेणार सुरुवात!खासदार शिंदे यांनी अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण (कडा), सोलापूर यांच्याकडे निवेदन देत पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी तात्काळ पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यांनी निवेदनात नमूद केल्या प्रमाणे,मोहोळ मंगळवेढा, पंढरपूर, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट या तालुक्यातील पाण्या अभावी शेतकरी अडचणीत सापडले होते.
भीमा नदीचे पात्र अनेक ठिकाणी कोरडे पडल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत होते. वेळेवर पाणी न मिळाल्यास शेतातील पिके जळून जाण्याची भीती निर्माण झाली होती, तर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला होता. या पार्श्वभूमीवर स्थानिक शेतकऱ्यांनी खासदार शिंदे यांच्याशी संपर्क साधून आपली व्यथा मांडली होती.
या सर्व परिस्थितीची दखल घेत खासदार प्रणिती शिंदे यांनी प्रशासनाकडे तातडीने पाणी सोडण्याची मागणी लावून धरली होती. अखेर प्रशासनाने त्यांच्या मागणीची दखल घेत उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्याने शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Mumbai Pune Expressway: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ सज्ज; एक मेपासून मार्ग खुला होणार, बोगद्यांत ‘एआय’ सुरक्षाप्रणाली..दरम्यान या संदर्भात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुलेमान तांबोळी यांच्याशी संपर्क साधला असता, भीमा नदीत पाणी सोडण्याचा निर्णय हा कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. फुकट श्रेय घेणारे त्यांच्या कारखान्याला येणारा ऊस वाचावा या उद्देशाने खोटे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तर खासदार प्रणिती शिंदे यांनी जनावरांच्या व माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा या उद्देशाने हा प्रश्न लावून धरला होता. हा या मध्ये मोठा फरक आहे.
सुलेमान तांबोळी, अध्यक्ष काँग्रेस (आय) मोहोळ तालुका.