देगलूर : शहरातील मोमीन गल्ली येथील मारोती मष्णाजी अक्यमवार (वय ४५) या मजुरी करणाऱ्या कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजेच रविवारी दुपारी उघडकीस आली. ही घटना दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास देगलूर येथील स्मशानभूमीजवळ घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मोमीन गल्ली भागात राहणारे मारुती अक्यमवार हे मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. काही दिवसांपासून ते मानसिक तणावाखाली असल्याचे बोलले जात होते. घरगुती कारणामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
मयताच्या पश्चात पत्नी व तीन मुले असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या प्रकरणी अधिक तपास देगलूर पोलिसांकडून सुरू असून, घटनेचे नेमके कारण समोर आलेले नाही या प्रकरणी देगलूर पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मारुती मुंडे हे करीत आहेत.