Nagpur News: छत्रपती संभाजीनगरनंतर (Chhatrapati SambhajiNagar News) आता नागपूरमध्ये (Nagpur News) देखील पाकिस्थान निर्मित गोरी ब्युटी क्रीमचा (Goree Beauty Cream)धुमकुळ बघायला मिळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या क्रीमच्या वापरामुळे अनेक महिलांना किडनीचे गंभीर विकार झाल्याचे समोर आलं आहे. चेहऱ्यावर लगेच गोरेपण यावे यासाठी अनेक महिला सोशल मीडियावरच्या रील बघून डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय मार्केटमध्ये सहज मिळणाऱ्या या फेअर ग्लो ब्युटी क्रीमची खरेदी करतायात आणि वापरताय. मात्र हीच क्रीम अनेकांसाठी गंभीर आजारासाठी कारणीभूत ठरत असल्याचा प्रकार उघड झाला आहे.
Nagpur News: दोन वर्षात एकाच ओपीडीमध्ये 18 महिलांना ब्युटी क्रीममुळे किडनीचे विकार
पाकिस्थान निर्मित गोरी ब्युटी क्रीमचा (Goree Beauty Cream) राज्यात अनेक ठिकाणी धुमकुळ बघायला मिळत आहे. झटपट गोरे होण्याचा दावा करणाऱ्या या ब्युटी क्रीम मात्र अनेक महिलांसाठी जीवघेण्या ठरत आहे. पाकिस्तान निर्मित गोरी ब्युटी क्रीममुळे नागपूरमध्ये महिलांना किडनीचे विकार झाल्याचे डॉक्टरांच्या तपासात पुढे आले. अवैध पद्धतीने विक्री होणाऱ्या गोरी ब्युटी क्रीममध्ये पारा (मर्क्युरीची अतिरिक्त मात्र असते. चेहऱ्यावर क्रीम लावल्यानंतर यातला मर्क्युरी त्वचेतून शरीराच्या आत जातो व पूढे रक्तात मिसळातो. यामुळे त्याचा थेट परिणाम महिलांच्या किडनीवर होतो. नागपूरमध्ये मागच्या दोन वर्षात एकाच ओपीडीमध्ये 18 महिलांना या ब्युटी क्रीममुळे किडनीचे विकार झाल्याचे पुढे आले आहे. महत्वाचं म्हणजे नागपूर शहरात याची खुलेआम विक्री सुरू आहे. त्यानंतर माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासन विभागाने शोध मोहित घेत मार्केटमधून मोठा साठा जप्त केला असून या क्रीमचे स्पॅमल पुढील तपासणीसाठी पाठवले आहे.
Seized Pakistani Products : जप्त केलेली पाकिस्तानी क्रीम्स
पोलिसांच्या या कारवाईत मल्लिका, झलक, गोरे, गोल्डन पर्ल, चांदणी, उजूबा, फेस फ्रेश, नूर हर्बल, न्यू फेस ब्युटी क्रीम यांसह विविध पाकिस्तानी क्रीम्स जप्त करण्यात आल्या. तसंच पारले गोल्ड, गोरे साबण आणि मल्लिका व्हिटॅमिन-C सिरम यांचाही समावेश आहे.
Health Risk : आरोग्यावर गंभीर परिणाम
या क्रीम्सचा वापर करणाऱ्या काही तरुण-तरुणींनी आरोग्य बिघडल्याचा दावा केला आहे. गोरं होण्याच्या नादात वापरलेल्या या क्रीम्समुळे त्वचेवरच नाही तर थेट किडनीवरही परिणाम होत असल्याची माहिती तज्ज्ञ डॉक्टरांनी दिली आहे.
Public Concern : नागरिकांसमोर मोठा प्रश्न
गोरं होण्याच्या हव्यासापोटी नागरिक स्वतःच्या आरोग्याशी खेळ करतायत का, असा गंभीर प्रश्न आता निर्माण झाला आहे. तज्ज्ञांच्या मते अशा क्रीम्स वापरून कायमस्वरूपी गोरे होता येत नाही, उलट त्वचा आणि किडनी दोन्ही धोक्यात येतात.
इतर महत्वाच्या बातम्या