40 वर्षीय कलाकार, जी दिवस-रात्र असायची दारूच्या नशेत, आई-वडिलांनी तिचं दुखावलेलं मन, आज करतेय बॉलिवूडवर राज्य
admin April 20, 2026 03:25 PM
[ad_1]

पंजाबी आणि बॉलिवूडमधील लोकप्रिय गायिका जास्मिन सँडलास सध्या तिच्या ‘धुरंधर 2’ चित्रपटातील ‘Jaiye Sajana’ या गाण्यामुळे प्रचंड चर्चेत आहे. Jaiye Sajana या गाण्याने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला असून चाहत्यांकडून त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. मात्र, या यशाच्या पार्श्वभूमीवर जैस्मीनने अलीकडील एका मुलाखतीत आपल्या आयुष्यातील कठीण काळाबद्दल मनमोकळेपणाने खुलासा केला आहे.

मुलाखतीदरम्यान जैस्मीन सॅंडलसने सांगितले की, तिच्या आयुष्यात एक असा टप्पा आला होता, जेव्हा ती मानसिक आणि भावनिकदृष्ट्या पूर्णपणे खचली होती. कुटुंबासोबतचे तणावपूर्ण संबंध आणि आई-वडिलांपासून झालेलं भावनिक अंतर यामुळे ती आतून तुटून गेली होती. लहानपणीच अनेक गोष्टी स्वतःहून समजून घ्याव्या लागल्या. ज्याचा तिच्या मनावर खोल परिणाम झाला.

‘आई-वडिलांनी मला खूप दुखावलं’

आई-वडिलांबद्दल बोलताना जैस्मीन म्हणाली, लहानपणी नकळतपणे माझ्या आई-वडिलांनी मला खूप दुखावलं. मी त्यांच्यावर प्रेम करते पण जेव्हा मुलाचं मन तुटतं, तेव्हा त्या जखमा कायम राहतात. ती पुढे म्हणाली की, पालकांव्यतिरिक्त माणसाकडे सुरक्षित अशी दुसरी जागा नसते. त्यामुळे ती आयुष्यभर एका घराच्या शोधात भटकत राहिली.

या कठीण काळात तिने दारूचा आधार घेतल्याचीही कबुली दिला. सुरुवातीला ती फक्त सवय होती पण नंतर ती गरज बनली. त्या सवयीमधून बाहेर पडणं तिच्यासाठी खूप अवघड होतं. वाढत्या वयासोबत जीवनातील चढ-उतारांना सामोरं जाताना तिने अनेक संघर्ष केले आणि आजही त्या काळाची आठवण तिला वेदना देऊन जाते.

यश आणि वैयक्तिक आयुष्यात समस्या

जैस्मीनने सांगितलं की, एकीकडे ती यशाच्या शिखरावर होती तर दुसरीकडे वैयक्तिक आयुष्यात अनेक समस्या होत्या. कुटुंबीयांपासून दूर जाणं, वडिलांचं निधन आणि भावनिक ताण या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यामुळे ती कोलमडली होती. मी जास्त प्रमाणात दारू प्यायले, त्याचा मला आज पश्चात्ताप होतो पण त्या काळात तेच माझ्यासाठी एकमेव आधार होतं, असंही ती म्हणाली.

तथापि, या सगळ्या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी संगीतानेच तिची साथ दिली. आपल्या भावना आणि वेदना तिने गाण्यांमधून व्यक्त केल्या आणि त्याचमुळे तिला पुन्हा उभं राहण्याची ताकद मिळाली. आज ती पुन्हा एकदा आपल्या करिअरच्या यशस्वी टप्प्यावर असून, तिच्या गाण्यांद्वारे ती चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.


[ad_2]
Source link
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.