IPL 2026 Rohit Sharma : MI च्या पुढल्या मॅचपूर्वी चाहत्यांसाठी ती बातमी आलीच… रोहित शर्माबाबत मोठी अपडेट काय ?
Tv9 Marathi April 20, 2026 03:45 PM

Rohit Sharma Update : रोहित शर्माची दुखापत आता कशी आहे ? गुजरातविरुद्धच्या सामन्यात तरी तो आता खेळू शकेल का ? या प्रश्नांची उत्तरं अख्ख्या भारताला हवी आहेत. रोहितला हॅमस्ट्रिंग दुखापत झाली असून याच इंज्युरीमुळेत तो पंजाब किंग्सविरुद्धचा मागचा सामना खेळू शकला नव्हत. मात्र आता तो सलग दुसऱ्या सामन्यासाठीही संघाबाहेर असेल का? असा सवाल सर्वांच्या मनात आहे. पण गुजरात टायटन्स (GT) विरुद्धच्या सामन्यापूर्वी रोहित शर्मा हा नेटमध्ये सराव करताना दिसला, हे एक सकारात्मक चिन्ह मानलं जात आहे. मात्र असं असलं तरी तो येत्या सामन्यात खेळू शकेल की नाही याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

रोहितच्या जागी आलेल्या डिकॉकने झळकावलं शतक

पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा खेळू शकला नव्हता, त्याच्या अनुपस्थितीत क्विंटन डी कॉकने रिकी पाँटिंगसोबत डावाची सुरुवात केली. हा डी कॉकचा या हंगामातील पहिलाच सामना होता, त्यावेळी खेलताना त्याने 7 षटकार आणि 8 चौकारांसह 60 चेंडूंमध्ये 112 धावा ठोकल्या. मात्र, क्विंटन डी कॉकने नाबाद शतक झकावूनही, पंजाब किंग्सविरुद्ध 195 धावांचे लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरल्याने मुंबई इंडियन्सचा पराभव झाला.

रोहित शर्मा खेळणार की नाही ?

मात्र आता असा प्रश्न उद्भवतो की दुखापत बरी झाल्यावर रोहित तंदुरुस्त होऊन परत आल्यावर काय होईल? त्याच्या अनुपस्थितीत खेळलेल्या डी कॉकला पुन्हा बाहेर बसावं लागेल का? या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी, रोहितच्या दुखापतीबद्दलच्या लेटेस्ट अपडेट्सवर एक नजर टाकूया. ‘रोहित शर्मा अहमदाबादमध्ये नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करत आहे’ असं मुंबई इंडियन्सने एक निवेदन जारी करत म्हटलं आहे. यादरम्यान, वैद्यकीय पथक आणि मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांचं त्याच्यावर सतत लक्ष आहे. पण असं असलं तरीही गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात रोहित खेळणार की नाही यायाबाबत अद्याप कोणताही अधिकृत निर्णय घेण्यात आलेला नाही.

रोहित खेळल्यास कोण जाणार बाहेर ?

दुखापत बरी होऊन जर रोहित शर्मा गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यासाठी संघात परतला, तर रिकल्टनला पुन्हा वगळलं जाण्याची दाट शक्यता आहे. शतक झळकावल्यानंतर आता क्विंटन डी कॉकला संघातून वगळणं हे कठीण दिसतंय.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.