Mahavatar Purushottam: गेल्अया काही दिवसांपासून 'रामायण' या चित्रपटाची एकच चर्चा आहे. 4 हजार कोटी रुपयांचं बजेट असणाऱ्या या चित्रपटातील प्रत्येक भूमिकेबाबत बोललं जात असताना आता आणखी एका मोठ्या पौराणिक चित्रपटाची घोषणा करण्यात आलीय. अभिनेता विकी कौशल आणि त्याच्या आगामी चित्रपट महावतार पुरुषोत्तमच्या निर्मात्यांनी परशुराम जयंती खास पद्धतीने साजरी केली. या निमित्ताने चित्रपटाचं एक दमदार पोस्टर रिलीज करण्यात आलं असून, त्यात परशुरामांच्या शौर्य, धर्म आणि न्यायाच्या संदेशाचं प्रभावी चित्रण करण्यात आलं आहे. विक्की कौशलचा लूक पाहून चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
परशुराम जयंतीच्या निमित्ताने धर्मा प्रोडक्शनने सोशल मीडियावर पोस्टर शेअर करत लिहिलं की, “धर्माच्या रक्षणासाठी कधी कधी कठोर निर्णय घ्यावे लागतात, आणि हाच परशुरामांचा मोठा संदेश आहे.” या पोस्टमधून निर्मात्यांनी त्या महान योद्ध्याला मानवंदना दिली आहे, ज्यांनी निडरपणे नेहमी योग्य गोष्टींचा मार्ग स्वीकारला. पोस्टर समोर येताच चित्रपटाबाबतची चर्चा रंगू लागली आहे.
View this post on Instagram
चित्रपटाबाबत आणखी एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात विक्की कौशलच्या अपोजिट एका नव्या चेहऱ्याची निवड होण्याची शक्यता आहे. यासाठी हरनाज संधू यांचं नाव चर्चेत असून, निर्माते त्यांच्याशी चर्चा करत असल्याचं समजतं. तसेच, या भूमिकेसाठी विक्की कौशल मोठं फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन करणार असून, पहलवानासारखी मजबूत शरीरयष्टी आणि रफ लूक तो साकारणार आहे.
दिग्दर्शक अश्विन कुमार यांचा हा चित्रपट डिसेंबर 2027 पर्यंत रिलीज होण्याची शक्यता आहे. मोठ्या स्केलवर तयार होणाऱ्या या चित्रपटात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि भव्य व्हिज्युअल्सचा वापर करण्यात येणार आहे. महावतार परशुराम हा भगवान परशुराम यांच्या जीवनावर आधारित असून, त्यांच्या संघर्ष आणि तत्त्वज्ञानाची कहाणी मोठ्या पडद्यावर मांडली जाणार आहे. सध्या विकी कौशल Love & War या संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात व्यस्त असल्यामुळे ‘महावतार परशुराम’च्या शूटिंगला थोडा उशीर होण्याची शक्यता आहे.