आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 31 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स आमनेसामने आहेत. दिल्लीचा हा या मोसमातील सहावा तर हैदराबादचा सातवा सामना आहे. उभयसंघातील सामन्याचं आयोजन हे हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. दिल्लीने टॉस जिंकला. दिल्ली कॅपिट्ल्सची 19 व्या मोसमात टॉस जिंकण्याची ही आतापर्यंत एकूण आणि सलग सहावी वेळ ठरली आहे. कॅप्टन अक्षर पटेल याने फिल्डिंगचा निर्णय घेत हैदराबादला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. यासह दिल्लीने सलग सहाव्या सामन्यातही चेजिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.
दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन : पथुम निसांका, केएल राहुल (विकेटकीपर), समीर रिझवी, नितीश राणा, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल (कॅप्टन), डेव्हिड मिलर, कुलदीप यादव, मुकेश कुमार, टी नटराजन आणि लुंगी एन्गिडी.
सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन (कॅप्टन), हेनरिक क्लासेन, सलील अरोरा (विकेटकीपर), अनिकेत वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवांग कुमार, हर्ष दुबे, साकिब हुसेन आणि एशान मलिंगा.