दांडी धुरीवाड्यात सोलर हायमास्ट
esakal April 21, 2026 10:45 PM

38696

दांडी धुरीवाड्यात सोलर हायमास्ट
मालवण : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान २०२५-२६ अंतर्गत दांडी-धुरीवाडा येथील श्रीकृष्ण मंदिर परिसरात बसविलेल्या सोलर हायमास्ट दिव्याचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. याबाबत स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले. हायमास्टचे लोकार्पण नगरसेविका अन्वेषा आचरेकर, भाजपचे तालुका उपाध्यक्ष सन्मेष परब यांच्या हस्ते झाले. दांडी धुरीवाडा परिसरातील नागरिकांची प्रदीर्घ काळापासूनची मागणी लक्षात घेऊन या हायमास्ट दिव्यासाठी पाठपुरावा केला होता. हायमास्टमुळे आता रात्रीच्या वेळी परिसर उजळून निघणार असून यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनेही मोठी मदत होणार आहे. उद्घाटनप्रसंगी सुधाकर मालंडकर, सचिन तारी, संजू धुरी, नरेश धुरी, रुपेश धुरी, भरत सारंग, प्रसाद धुरी, राजू धुरी, संजय धुरी, नागेश कुबल, विनायक धुरी, निहार धुरी, हेमंत पराडकर, सुनील धुरी, कृष्णा कुबल आदी उपस्थित होते..

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.