IPL 2026 Points Table : घेणं नाय देणं, दिल्लीच्या पराभवाचा राजस्थानला फटका, हैदराबादची झेप
GH News April 22, 2026 03:09 AM

सनरायजर्स हैदराबादने राजीव गांधी स्टेडियममध्ये पाहुण्या दिल्ली कॅपिट्ल्सवर 47 धावांनी विजय मिळवला. हैदराबादने दिल्लीसमोर 243 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र दिल्लीने शेवटच्या चेंडूपर्यंत प्रतिकार केला. मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. दिल्लीला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 195 धावांपर्यंतच पोहचता आलं. अशाप्रकारे हैदराबादने या मोसमात विजयी हॅट्रिक पू्र्ण करत एकूण चौथा सामना जिंकला. हैदराबादला या विजयासह फायदा झाला आहे. तर दिल्ली पराभवानंतर आपल्या स्थानी कायम आहे. मात्र ज्या राजस्थान रॉयल्सचा हैदराबाद-दिल्ली सामन्यासह काही संबंध नव्हता त्यांना मात्र मोठा फटका बसला आहे. नक्की काय झालंय? हे जाणून घेऊयात.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.