IPL 2026 Points Table Updates: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेचा आता पहिला टप्पा संपत आला असून आता संघांमध्ये पहिल्या चारमध्ये स्थान मिळवण्यासाठी चुरस दिसून येत आहे. नुकतेच सनरायझर्स हैदराबादने मंगळवारी (२१ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्सला ४७ धावांनी पराभूत करत मोठी झेप घेतली आहे.
अडखळत सुरुवात झालेल्या हैदराबादने (SRH) आता चांगली लय पकडली आहे. त्यामुळे त्यांनी आता पाँइंट्स टेबलमध्येही (Points Table) पहिल्या तीनमध्ये स्थान मिळवण्यात यश मिळवले.
IPL 2026: १० सिक्स, १० फोर अन् शतक... Abhishek Sharma ने तब्बल ७ मोठे विक्रम केले नावावर; दिग्गजांच्या पंक्तीत स्थानहैदराबादनेघरच्या मैदानात दिल्लीवर मिळवलेला विजय हा त्यांचा ७ सामन्यांतील चौथा विजय होता. तसेच त्यांनी ३ पराभव स्वीकारले आहेत. त्यामुळे हैदराबादचे आता ८ गुण झाले आहेत. हैदराबादने या हंगामात मोठे विजय मिळवले आहेत, तर पराभव कमी फरकाने स्वीकारले आहेत. त्यामुळे त्यांचा नेट रन रेट चांगला आहे. त्यामुळे आता हैदराबाद तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
मात्र रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचेही ८ गुण असले, तरी त्यांचा नेट रन रेट हैदराबादपेक्षा चांगला आहे. राजस्थान रॉयल्सचेही ८ गुण आहेत. मात्र चांगल्या नेट रन रेटमुळे हैदराबादने त्यांना मागे टाकले आहे. राजस्थान चौथ्या क्रमांकावर घसरले आहेत.
दिल्ली कॅपिटल्स मात्र या पराभवानंतरही पाचव्या क्रमांकावर कायम आहेत. त्यांचे ६ सामन्यांत तीन विजय आणि तीन पराभवांसह ६ गुण आहेत. गुजरात टायटन्सचेही ६ गुण आहेत, परंतु त्यांचा नेट रन रेट दिल्लीपेक्षा खराब आहे. मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स प्रत्येकी ४ गुणांसह अनुक्रमे ७, ८ आणि ९ व्या क्रमांकावर आहेत. कोलकाता नाईट रायडर्स ३ गुणांसह शेवटच्या क्रमांकाव आहेत.
दरम्यान, आत्तापर्यंत सनरायझर्स हैदाराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स हे असे दोनच संघ आहेत, ज्यांचे ७ सामने झाले असून आता त्यांचे साखळी फेरीतील ७ सामने बाकी आहेत. बाकी इतर ८ संघांनी आत्तापर्यंत ६ सामने खेळले आहेत.
IPL 2026: अभिषेकच्या शतकानंतर मलिंगाचा विकेट्सचा 'चौकार'! हैदराबादचा दिल्लीवर दिमाखदार विजय अन् काव्या मारनचं सेलिब्रेशन हैदराबादचा दिल्लीवर विजयमंगळवारी झालेल्या सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना अभिषेक शर्माच्या १३५ धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर २० षटकात २ बाद २४२ धावा केल्या होत्या. त्यानंतर २४३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सने २० षटकात ९ बाद १९५ धावाच करता आल्या. हैदराबादकडून इशान मलिंगाने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.