Cibil Score : खराब सिबिल स्कोअरमुळं कर्ज मंजूर होईना? सिबिल स्कोअर 800  च्या पार कसा पोहोचवणार?
Marathi April 22, 2026 03:25 AM

नवी दिल्ली: आजकाल सिबिल स्कोअर चांगला असणं आवश्यक आहे. याच आधारावर बँकेतून कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मिळतं. सिबिल स्कोअर तीन अंकी असतो तो 300 ते 900 दरम्यान असतो. 700  पेक्षा अधिक स्कोअर  असणं चांगलं मानलं जातं. मात्र, जर तुमचा स्कोअर कमी असेल तर तुम्हाला अधिक व्याजानं कर्ज काढावं लागू शकतं. अनेकदा तुमचा कर्जाचा अर्ज  नामंजूर होऊ शकतो. सिबिल स्कोअर कसा वाढवायचा हे जाणून घ्या?

सर्वात पहिली गोष्ट म्हणजे वेळेवर कर्जाचे हप्ते भरणे. कर्जाचा हप्ता असो किंवा क्रेडिट कार्डचं बिल असो ईएमआय उशीर न करता वेळेवर भरला पाहिजे.  ईएमआय उशिरा भरल्यास दंड द्यावा लागू शकतो, याशिवाय सिबिल स्कोअर खराब होऊ शकतो. हे टाळायला हवं.

सिबिल स्कोअर चांगला ठेवण्यासाठी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जितकं कर्ज आवश्यक आहे. तितकेच घ्यावे. आजकाल कर्ज घेणं सोपं झालं आहे. त्यामुळं अनेक कर्ज काढल्यानं हप्ते वाढतात, हप्ते वेळेवर न भरल्यानं जोखीम वाढते. यामुळं कर्ज घेताना उत्पन्न आणि खर्च लक्षात घेतले पाहिजेत.

क्रेडिट कार्डचा समजूतदारपणे वापर करणं देखील सिबिल स्कोअर चांगला असण्यासाठी आवश्यक आहे. काही लोक क्रेडिट कार्डचा चुकीचा वापर करतात, मिनिमन पेमेंट सोडून इतर रक्कम भरत नाहीत, यामुळं व्याज 42 ते 46  टक्क्यांपर्यंत भरावं लागतं.  क्रेडिट कार्डचे बिल पूर्णपणे भरण्याचा प्रय्तन करा. गरज असल्याचं त्याचा वापर करा.

वारंवार कर्जासाठी विविध ठिकाणी अर्ज केल्यानं तुमचा सिबिल स्कोअर खराब होऊ शकतो. कारणं तुम्ही वारंवार कर्जासाठी अर्ज करताय याची माहिती मिळते. यामुळं कर्ज करण्यासाठी तुम्ही तुमची पात्रता लक्षात घ्या.

सिबिल स्कोअर वारंवार तपासणं देखील महत्त्वाचं आहे. काहीवेळा रिपोर्टमध्ये चूक होऊ शकते. तुम्ही कर्ज घेतलं असेल आणि ते अपडेट झालनं नसेल तर त्यामध्ये सुधारणा करु घ्यावी.  सिबिल स्कोअर चांगला ठेवण्यासाठी दक्षता घेतल्यास कर्ज काढताना ते सहजपणे आणि कमी व्याजदरावर उपलब्ध होऊ शकतं.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.