SRH vs DC Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत मंगळवारी (२१ एप्रिल) सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ४७ धावांनी दमदार विजय मिळवला.
हा हैदराबादचा हंगामातील चौथा विजय ठरला. त्यामुळे त्यांचे ८ गुण झाले आहेत. हैदराबादच्या विजयात अभिषेक शर्मापाठोपाठ (Abhishek Sharma) इशान मलिंगाने (Eshan Malinga) मोलाचा वाटा उचलला.
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्ससमोर सनरायझर्स हैदराबादने २४३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीला २० षटकात ९ बाद १९५ धावांच करता आल्या. या विजयानंतर सनरायझर्स हैदराबादची संघमालकीण काव्या मारन (Kavya Maran) अत्यंत खूश होती. तिने आनंदाने सेलिब्रेशनही केले. या विजयासह हैदराबादने पाँइंट्स टेबलमध्ये तिसरे स्थानही मिळवले.
IPL 2026: १० सिक्स, १० फोर अन् शतक... Abhishek Sharma ने तब्बल ७ मोठे विक्रम केले नावावर; दिग्गजांच्या पंक्तीत स्थानया सामन्यात दिल्लीसाठी पाथुम निसंका आणि केएल राहुल यांनी डावाची सुरुवात केली. या दोघांची सुरुवात आक्रमक केली, पण तिसऱ्या षटकात निसंकाला दिलशान मदुशंकाने ८ धावांवर बाद केले. पण नंतर केएल राहुलसह नितीश राणाने चांगली फलंदाजी केली.
राणा आक्रमक खेळत होता. त्यामुळे दिल्लीच्या आशा उंचावल्या होत्या. या दोघांमध्ये ८६ धावांची भागीदारीही झाली होती. पण १० व्या षटकात केएल राहुलचा अडथळा साकिब हुसैनने दूर केला. त्याने अभिषेक शर्माच्या हातून केएल राहुलला २३ चेंडूत ३७ धावांवर झेलबाद केले.
त्याच्यापुढचे इशान मलिंगाने टाकलेले ११ वे षटक दिल्लीला सर्वात मोठा धक्का देणारे ठरले. या षटकात पहिल्याच चेंडूवर त्याने नितीश राणा ला ३० चेंडूत ५७ धावांवर असताना अभिषेक शर्माच्याच हातून झेलबाद केले. त्याच्या पुढच्याच चेंडूवर इशानने डेव्हिड मिलरला शून्यावर त्रिफळाचीत केले.
तरी नंतर ट्रिस्टन स्टब्स आणि समीर रिझवी यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यात ५९ धावांची भागीदारी झाली. पण ही भागीदारीही १६ व्या षटकात मलिंगानेच तोडली. त्याने स्टब्सला २७ धावांवर बाद केले. १८ व्या षटकात आशुतोष शर्मालाही १४ धावांवर मलिंगानेच बाद केले. त्यानंतर २० व्या षटकात हर्ष दुबेने ३ विकेट्स घेतल्या. त्याने अक्षर पेटल (२), समीर रिझवी (४१) आणि लुंगी एनगिडी (०) यांना बाद केले.
हैदराबादकडून इशान मलिंगाने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या, हर्ष दुबेने ३ विकेट्स घेतल्या. दिलशान मदुशंका आणि साकिब हुसैन यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
MI vs CSK: चेन्नईचा आता मुंबईशी सामना, पण IPL 2026 मधून बाहेर झालेल्या आयुष म्हात्रेची जागा घेणार कोण? हे आहेत ३ पर्यायतत्पुर्वी हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात २ बाद २४२ धावा केल्या. हैदराबादकडून अभिषेक शर्माने ६८ चेंडूत नाबाद १३५ धावांची खेळी केली, ज्यात १० चौकार आणि १० षटकारांचा समावेश होता. हेनरिक क्लासेनने १३ चेंडूत ३७ धावांची नाबाद खेळी केली. ट्रॅव्हिस हेडने २६ चेंडूत ३७ धावा केल्या, तर कर्णधार इशान किशनने १३ चेंडूत २५ धावा केल्या.
दिल्लीकडून एकमेव विकेट अक्षर पटेलने घेतली. त्याने हेडला बाद केले. इशान धावबाद झाला होता.