ज्येष्ठ नागरिकांची सेल्फ केअर
Marathi April 22, 2026 07:25 AM

आजच्या बदलत्या जीवनशैलीत मुलं शिक्षण किंवा नोकरीनिमित्त बाहेरगावी जाण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे घरातील अनेक ज्येष्ठ नागरिक एकटे पडले आहेत. अशा परिस्थितीत त्यांची सुरक्षितता, आरोग्य आणि मानसिक समाधान यांची विशेष काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पण त्यासाठी प्रत्येकवेळी इतरांवर अवलंबून न राहता ज्येष्ठ नागरिक स्मार्टली देखील स्वत:ची काळजी कशी घेऊ शकतात ते बघूया.

१. सुरक्षिततेची काळजी
अनोळखी व्यक्तींना घरात प्रवेश देण्यापूर्वी खात्री करावी. शक्य असल्यास सीसीटीव्ही किंवा डोअर कॅमेरा बसवावा.

२. आरोग्य
नियमित औषधे वेळेवर घ्यावीत. जवळच्या डॉक्टरांचा संपर्क क्रमांक जवळ ठेवावा. आवश्यक असल्यास हेल्थ चेकअप नियमित करावा.

३. आपत्कालीन संपर्क
कुटुंबीय, शेजारी, मित्र यांचे फोन नंबर सहज उपलब्ध ठेवावेत. मोबाईलमध्ये स्पीड डायल सेट करणे उपयोगी ठरते.

४. सामाजिक संवाद
एकटेपणा टाळण्यासाठी शेजाऱ्यांशी, मित्रांशी संपर्क ठेवावा. सामाजिक उपक्रम, क्लब किंवा मंडळात सहभागी व्हावे.

५. तंत्रज्ञानाचा वापर
मोबाईल, व्हिडिओ कॉल, मेसेजिंग अॅप्स यांचा वापर करून कुटुंबीयांशी संपर्कात राहावे. यामुळे सुरक्षिततेची भावना वाढते.

६. आर्थिक सुरक्षितता
बँक व्यवहार काळजीपूर्वक करावेत. कोणालाही ओटीपी, पासवर्ड किंवा वैयक्तिक माहिती देऊ नये.

७. नियमित दिनचर्या ठेवणे
व्यायाम, योग, वाचन, छंद यासाठी वेळ द्यावा. यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते.

८. मदत सेवांचा वापर
गरज पडल्यास घरपोच सेवा, आपत्कालीन सेवा किंवा केअरटेकरची मदत घ्यावी.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.