Panchang 22 April 2026 : आजचे पंचांग! सूर्योदय, राहुकाल, शुभ मुहूर्त आणि राशीभविष्य
esakal April 22, 2026 10:45 AM

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀ धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार

☀ सूर्योदय – ०६:१६

☀ सूर्यास्त – १८:५०

चंद्रोदय – १०:२७

⭐ प्रात: संध्या – ०५:०४ ते ०६:१६

⭐ सायं संध्या – १८:५० ते २०:०२

⭐ अपराण्हकाळ – १३:४८ ते १६:१९

⭐ प्रदोषकाळ – १८:५० ते २१:०७

⭐ निशीथ काळ – ००:१० ते ००:५५

⭐ राहु काळ – १२:३३ ते १४:०७

⭐ यमघंट काळ – ०७:५० ते ०९:२४

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त– ०६:१६ ते ०७:५०

अमृत मुहूर्त– ०७:५० ते ०९:२४

विजय मुहूर्त— १४:३८ ते १५:२८

⏳ कार्यसिद्धी वेळा – ०९:२४ ते ०९:३७ | १२:०७ ते १२:३३ | १४:०७ ते १४:३८ | १६:१९ ते १७:५९ | २०:२१ ते २२:३८

⚠️ कार्यनाशक वेळा – ०६:१६ ते ०७:५६ | ०९:३७ ते १२:०७ | १४:३८ ते १६:१९ | १७:५९ ते २०:२१ | २२:३८ ते २४:००

मुंबई बंदर भरती/ओहोटी – भरती: १०:३० ते १७:२७ | ओहोटी: १७:२७ ते ००:२२ पुढील दिवस | भरती: ००:२२ पुढील दिवस ते ०५:५८ पुढील दिवस | ओहोटी: ०५:५८ पुढील दिवस ते ११:३६ पुढील दिवस

ग्रहमुखात आहुती – बुध (शुभ) २६:०४ नं. शुक्र (शुभ)

अग्निवास – पृथ्वीवर (दिवसभर)

शिववास – २७:०१ पर्यंत नंदीवर असल्यामुळे काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे त्यानंतर भोजनात असल्यामुळे काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे

शालिवाहन शक १९४८

संवत्सर पराभव

अयन – उत्तरायण

ऋतु – वसंत

मास – वैशाख

पक्ष - शुक्ल पक्ष

तिथी – षष्ठी (२७:०१ नं.) सप्तमी

वार – बुधवार

नक्षत्र – आर्द्रा (२६:०४ नं.) पुनर्वसू

योग – अतिगंड (१२:३७ नं.) सुकर्मा

करण – कौलव (१६:०९ नं.) तैतिल

चंद्र रास – मिथुन

सूर्य रास – मेष

गुरु रास – मिथुन

दिनविशेष – श्रीनृसिंह नवरात्रारंभ, श्री रामानुजाचार्य जयंती,वामन पंडित पु.ति(भोगाव), रवियोग २६.०४ प.

✅विशेषसत्ता आणि अति आत्मविश्वास या गोष्टी एकत्र आल्या की त्याचे परिणाम काय होऊ शकतात, हे सध्या जग पाहतं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प - जे काही महिन्यांपूर्वी स्वतःला शांततेचं नोबेल प्रदान करण्यात यावं या विचारावर ठाम होते, त्यांनी अमेरिकेच्या युद्धखोर वृत्तीचं दर्शन दाखवायला सुरुवात केली. इराणविरुद्ध युद्ध पुकारून संपूर्ण जगाला वेठीला धरलं आहे.

त्यांच्या कृतीतून आणि विधानांमधून नेहमीच परस्पर विरोधी अर्थ निघताना आपण पाहिलं आहे.

अशा या सत्तेच्या केंद्रस्थानी असणाऱ्या पण काहीशा चंचल, अति महत्त्वाकांक्षी माणसाची पत्रिका अभ्यासली, तर त्यांच्या स्वभावामागचं रहस्य उलगडत येईल या दृष्टीने 'पत्रिका काय सांगते?' या मालिकेमध्ये हा भाग आम्ही घेऊन आलो आहोत.

नेमक्या कोणत्या ग्रहयोगांमुळे सत्तेच्या शिखरापर्यंत असा माणूस पोहोचतो आणि जगासमोर आपली एक प्रतिमा निर्माण करण्यासाठी कोणते ग्रह सहाय्य्य करतात याविषयी जाणून घेऊ या पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक श्री. गौरव देशपांडे.

https://youtu.be/tE_qAGxSiig?si=YymVhEj8Jp4e8rS9

शुभाशुभ दिवस - शुभ दिवस

श्राद्ध तिथी - षष्ठी श्राद्ध

आजचे वस्त्र – हिरवे

स्नान विशेष – गहूला वनस्पतीचे चूर्ण पाण्यात टाकून स्नान करावे.

उपासना –विष्णु सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण आणि ‘बुं बुधाय नमः’ या मंत्राचा जप करावा.

दान – सत्पात्री व्यक्तीस निळे वस्त्र, सुवर्ण, कांस्यपात्र, मूग, फुले दान करावे

तिथीनुसार वर्ज्य – तैलाभ्यंग

दिशाशूल उपाय – दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा करण्यापूर्वी तीळ भक्षण करून बाहेर पडावे.

चंद्रबळ – मेष , वृषभ , मिथुन , सिंह , कन्या , तुळ , धनु , मकर , कुंभ — या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.