land division 100 rupees registration : वडिलोपार्जित शेतजमिनीचे वारसाहक्काने असलेल्या भाऊ-बहिणी, कुटुंबातील सदस्यांची वाटणीपत्र आता केवळ १०० रुपयांत होणार आहे. त्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून आकारले जाणारे नोंदणी शुल्क माफ केले आहे.
सातबारा उताऱ्यावर नावे वेगळी न झाल्याने कुटुंबांत वाद, खरेदी-विक्रीत अडचणी आणि कायदेशीर गुंतागुंत निर्माण होत असे. म्हणून राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. आता अर्जदाराला तहसीलदारांकडे अर्ज करून किंवा खासगी वाटणीपत्र तयार करून सहज नोंदणी करता येणार आहे. सातबारा उताऱ्यावर नावे वेगळी झाल्याने भविष्यातील वारसा, विक्री किंवा कर्ज प्रकरणांत कायदेशीर अडचणी येत होत्या.
पूर्वी काय होते?
एकाच कुटुंबातील सदस्यांनी वडिलोपार्जित जमिनीचे वाटप केल्यास नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. काही लोक थेट दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन नोंदणी करत होते. त्यासाठीच्या नियमात स्पष्टता नसल्याने नोंदणी फी आकारली जात होती. आता तहसीलदार किंवा नोंदणी कार्यालयात कुठेही गेला तरी नोंदणी फी भरावी लागणार नाही.
- चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री
Land Dispute Clash: सोरतापवाडीत जमिनीच्या मोजणीवरून दोन गटांत हाणामारी; आठ जणांवर परस्पर गुन्हे दाखलमुद्रांक शुल्क : १०० रुपये
नोंदणी शुल्क : १ टक्का (कमाल ३० हजार रुपये
त्यामुळे अनेकजण नोंदणी टाळत होते
आता काय बदललं?
नोंदणी शुल्क पूर्ण माफ
फक्त १०० रूपयांत वाटणीपत्र नोंदणी
पूर्वीच्या अडचणी
सातबारा उताऱ्यावर नावे
वेगळी होत नव्हती
कुटुंबांत वाद
जमीन विक्री-खरेदीत अडथळे
कायदेशीर गुंतागुंत
नवीन निर्णयाचे फायदे
लहान शेतकऱ्यांचा मोठा खर्च वाचणार
जमीन वाटणी सोपी होणार
कायदेशीर अडचणी कमी
प्रक्रिया अधिक जलद व पारदर्शक
नोंदणी कशी कराल?
तहसीलदारांकडे थेट अर्ज
किंवा खासगी वाटणीपत्र तयार करून नोंदणी