कधीही हाहाकार होऊ शकतो.. अमेरिकेची शस्त्रसंधी नव्हे तर.. इराणच्या दाव्याने खळबळ, थेट..
GH News April 22, 2026 01:10 PM

गेल्या 24 तासांपासून इराण आणि अमेरिका युद्धात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यामध्येच इराणच्या संसदेचे अध्यक्षांचे सल्लागार आणि अमेरिकेच्यासोबतच्या युद्धविराम बैठकीचे इराणचे प्रमुख मोहम्मद बाहेर गालिबाफ यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा अचानक केलेली नसल्याचे म्हटले. डोनाल्ड ट्रम्प यांचा त्यामागे मोठा उद्देश असल्याचेही त्यांनी म्हटले. म्हणजेच अमेरिकेचा शस्त्रसंधीमागे मोठा डाव असल्याचे दिसत आहे. अचानक मोठा हल्ला करण्याची तयारी अमेरिकेकडून सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले. दोन आठवड्यांची शस्त्रसंधी संपण्याकरिता काही तास शिल्लक असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अत्यंत मोठी घोषणा करण्यात आली. इराण आणि अमेरिकेतील शस्त्रसंधी अशावेळी करण्यात आली, ज्यावेळी जगाला वाटत होते की, अमेरिका एखादा मोठा हल्ला इराणवर करेल. पण अमेरिकेने मोठा युटर्न घेतल्याचे बघायला मिळाले.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, इराणकडून अमेरिकेची नाकेबंदी तोडण्याकरिता काही प्रयत्न केली जात आहेत. शिवाय या युद्धसंधीदरम्यान अमेरिका कोणत्याही क्षणी मोठा हल्ला करू शकते असे इराणला वाटत आहे. यामुळे इराण देखील तयारीत आहे. होर्मुज खाडी जोपर्यंत पूर्ण बंद होत नाही, तोपर्यंत इराण युद्धातून मागे हटणार नसल्याचे स्पष्ट मत अमेरिकेचे आहे.

सल्लागाराने अमेरिकेच्या नाकेबंदीला लष्करी प्रत्युत्तर देण्याचे आवाहनही केले आहे. इराणचे एक जहाज अगोदरच अमेरिकेकडून जप्त करण्यात आले. हे जहाज चीनमधून इराणमध्ये येत होते. या जहाजाला परत जाण्यास अमेरिकेने सांगितले होते. मात्र, जहाज परतले नाही. जहाजाने अमेरिकेची नाकेबंदी तोडण्याचा प्रयत्न अमेरिकेने केला आहे.

ट्रुथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, आम्ही युद्धसंधीचा निर्णय पाकिस्तानने केलेल्या विनंतीनंतर घेतला आहे. मुळात म्हणजे इराणी सरकारमध्ये गंभीर मतभेद असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. जोपर्यंत ते एक समान प्रस्ताव सादर करत नाहीत, तोपर्यंत आम्ही आमची आक्रमक कारवाई थांबवण्याचा आणि शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी म्हटले. मात्र, यादरम्यान पाकिस्तानचा उदो उदो करताना डोनाल्ड ट्रम्प दिसले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.