गारपिट होणार, तो आजही कोसळणार, राज्यात हाय अलर्ट, तब्बल इतक्या जिल्ह्यांमध्ये..
Tv9 Marathi April 22, 2026 11:45 AM

राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून बदल होताना दिसत आहेत. कधी पाऊस तर कधी उष्णता अशी स्थिती आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने मोठा अंदाज दिला. कालपासूनच राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. आजही पावसाचा अंदाज आहे. मागच्या आठवड्यात राज्यात प्रचंड उष्णता वाढताना दिसली. आताही काही जिल्ह्यात उष्णता आहे, पण पाऊस कोसळत आहे. राज्यातून अवकाळी पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाही. सततच्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. आजही पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. भारतीय हवामान विभागाकडून मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आला. अनेक भागात ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे. काल परभणी, अमरावती, हिंगोली, यवतमाळ, सिंधुदुर्ग या भागात जोरदार पाऊस झाला.होत  गारपिटीसह पाऊस होत आहे.

राज्यातील अनेक भागात पावसाने थैमान घातले. धाराशिव जिल्ह्यात अवकाळीचा तडाका सुरूच आहे. धाराशिव तालुक्यातील बामणेवाडी आणि केशेगाव शिवारात विजेच्या कडकडाटासह गाराच्या पाऊस झाला. काढून टाकलेली ज्वारी आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले. धाराशिव जिल्ह्यात पाऊस मागील चार दिवसापासून वेगवेगळ्या ठिकाणी कोसळत आहे. सोलापूर शहर जिल्ह्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली.

राज्यातील हवामानात मागील काही दिवसांपासून बदल होत असून सध्या राज्यात काही ठिकाणी उष्णतेची लाटेसदृश्य परिस्थिती तर काही ठिकाणी वादळी पावसाची नोंद होत आहे. मुंबईत मागील काही दिवसांपासून सकाळी ढगाळ वातावरण असले तरीही दुपारच्या सुमारास उकाड्याचा त्रास मुंबईकरांना सहन करावा लागत आहे. दरम्यान, गुरुवारी आणि शुक्रवारी शहरात उष्ण आणि दमट वातावरण राहील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

शहरातील अनेक भागात गारांचा पाऊस झाला. सोलापुरातील होडगी रोड, लष्कर, सात रस्ता, परिसरात गारांसह पावसाची तुफान बॅटिंग. दिवसभरातील ढगाळ वातावरणानंतर सोलापूर जिल्ह्यात पावसाला दमदार सुरुवात. वाशिम जिल्ह्यातील अनेक गावांमधील शेत रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे, चिखल आणि दगडांमुळे शेतकऱ्यांना शेतात जाणे-येणे कठीण झाले आहे.

मालेगाव तालुक्यात कांदा उत्पादक शेतकरी सध्या दुहेरी संकटाचा सामना करत आहेत. एका बाजूला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, तर दुसऱ्या बाजूला बाजारपेठेत कांद्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अचानक झालेल्या अवकाळी पाऊस व गारपटीमुळे शेतातील कांदा अक्षरशः झोडपला गेला. अनेक ठिकाणी साठवणूक केलेला कांदाही खराब होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्याचवेळी बाजारात कांद्याचे दर घसरल्याने शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.