2006 मालेगाव स्फोटातील चार आरोपींना मोठा दिलासा! उच्च न्यायालयाने फेटाळले सत्र न्यायालयाचे आरोप
सचिन गाड April 22, 2026 03:13 PM

Malegaon Blast Case Verdict: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात (Malegaon Blast Case Verdict) उच्च न्यायालयाने बुधवारी महत्त्वाचा निर्णय सुनावला. मुंबई उच्च न्यायालयाने या खटल्यातील चार आरोपींना मोठा दिलासा दिला आहे. या चार आरोपींविरीधातील आरोप निश्चित करण्याचा सत्र न्यायालयाने दिलेला आदेश मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. (Malegaon Blast Case Verdict)

उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी असलेले राजेंद्र चौधरी, धान सिंह, लोकेश शर्मा आणि मनोहर नरवारीया यांच्याविरोधातील खटला संपुष्टात येणार आहे. या खटल्याच्या सुनावणीवेळी राष्ट्रीय तपास यंत्रणेला कोर्टात ही घटना प्रत्यक्ष पाहिल्याचा दावा करणारी एकही व्यक्ती सादर करता आली नाही. त्यामुळे आरोपपत्रातील इतर आरोपींची सुटका स्पष्टपणे बेकायदेशीर असल्याचा आरोपींच्या वकिलांनी युक्तिवाद केला होता. (Malegaon Blast Case Verdict)

2006 च्या मालेगावात झालेल्या चार स्फोटांमध्ये 31 जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आरोपींविरोधात ऑक्टोबर महिन्यात विशेष सत्र न्यायालयाने हत्या, गुन्हेगारी कट रचणे तसेच युएपीए  अंतर्गत आरोप निश्चित केले होते. मात्र,  आरोप निश्चित करण्याच्या सत्र न्यायालयाच्या आदेशाला आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होते. 2008 सालच्या मालेगाव स्फटांमध्ये सगळ्या सातही आरोपींच्या निर्दोष सुटकेनंतर 2006 सालच्या मालेगाव स्फोटांमधील आरोपींची निर्दोष सुटका झाली आहे. (Malegaon Blast Case Verdict)

Malegaon Blast Case Verdict:  आधी 2008 सालच्या स्फोट प्रकरणातील सातही आरोपींच्या निर्दोष सुटकेनंतर आता 2006मधील आरोपींची देखील सुटका

मालेगाव स्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. केवळ संशयाच्या आधारावर आरोपीना दोषी ठरवू शकत नाही. त्यामुळे सगळ्या आरोपींची निर्दोष सुटका करण्यात येत आहे, असं एनआयएच्या विशेष न्यायालयाकडून सांगण्यात आले होते. 1000 पानांहून अधिक पानांचा निकाल असल्याचं न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले. मालेगावमध्ये 29 सप्टेंबर 2008 साली झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणी (Malegaon Blast Case Verdict) न्यायालयाने 31 जुलै 2025 ला निकाल सुनावण्यात आला होता.

भिक्खू चौकात झालेल्या या स्फोटात 6 निरपराध नागरिकांचे प्राण गेले. तर 100 हून अधिक जण गंभीर जखमी झाले होते. बॉम्बस्फोटाच्या या घटनेनंतर अनेक कुटुंबं उध्वस्त झाली होती. आता, तब्बल 17 वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल मुंबईच्या एनआयए या विशेष न्यायालयात आज निकाल सुनावण्यात आला. निर्दोष सुटका होताच आरोपींनी न्यायालयाचे आभार मानले. आज आम्हाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला, असं म्हणत आरोपी भावूक झाल्याचेही पाहायला मिळाले. 

Malegaon Blast Case Verdict:  2006 च्या मालेगाव स्फोटाप्रकरणी प्रकरणी चौघा आरोपींना मोठा दिलासा

2006 च्या मालेगाव स्फोटाप्रकरणी प्रकरणी चौघा आरोपींना मोठा दिलासा मिळाला आहे. या स्फोटातील चौघा आरोपींची मुंबई उच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपींविरोधात आरोप निश्चित करण्याचे सत्र न्यायालयाचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी असलेले राजेंद्र चौधरी, धान सिंह, लोकेश शर्मा आणि मनोहर नरवारीया यांच्याविरोधातील खटला संपुष्टात आणला आहे. 

राष्ट्रीय तपास यंत्रणेला प्रत्यक्ष घटना पाहिल्याचा दावा करणारा एकही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सादर करता आला नाही तसेच आरोपपत्रातील इतर आरोपींची सुटका स्पष्टपणे बेकायदेशीर असल्याचा आरोपींच्या वकिलांनी युक्तिवाद केला होता. 2006 च्या मालेगावात झालेल्या चार स्फोटांमध्ये ३१ जणांचा मृत्यू झाला होता याप्रकरणी आरोपींविरोधात ऑक्टोबर महिन्यात विशेष सत्र न्यायालयाने हत्या, गुन्हेगारी कट रचणे तसेच युएपीए अंतर्गत आरोप निश्चित केले होते. मात्र आरोप निश्चित करण्याच्या सत्र न्यायालयाच्या आदेशाला आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. 2008 सालच्या मालेगाव स्फटांमध्ये सगळ्या सातही आरोपींच्या निर्दोष सुटकेनंतर 2006 सालच्या मालेगाव स्फोटांमधील आरोपींची निर्दोष सुटका झाली आहे. 

 

 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.