Virat Kohli Ex Girlfriend Izabelle Leite: भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) यानं एका जर्मन व्लॉगरनं पोस्ट केलेल्या फोटोला लाईक केलं आणि संपूर्ण सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं. विराटनं केलेल्या या कृतीमुळे वेगवेगळ्या कमेंट समोर आल्यात. अनेकांनी विराटला ट्रोलही केलं, तर काहींनी विराटची बाजू घेतली. पण, या सर्व गोंधळात एका कमेंटनं सर्वांचं लक्ष वेधलंय. ही कमेंट होती, विराट कोहलीची एक्स गर्लफ्रेंड इझाबेल लिट (Izabelle Leite) हिची. विराटनं जर्मन व्लॉगरची पोस्ट लाईक केली आणि नेटकऱ्यांनी विषय चघळताना तिचं नाव विनाकारण ओढलं, यावर तिनं प्रतिक्रिया दिलेली.
टीम इंडियाची रन मशीन विराट कोहली (Run Machine Virat Kohli) पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. पण, यावेळी त्यानं रचलेला धावांचा डोंगर कारण नाहीतर, जर्मन व्लॉगर 'LizLaz' (German Vlogger LizLaz) हिच्या इन्स्टाग्राम पोस्टला लाईक केल्यामुळे चर्चेत आलाय. इंटरनेटवरील लोकांनी त्याची खिल्ली उडवण्यापासून ते त्याच्यावर कठोर टीका करण्यापर्यंत सर्व काही केलं असतानाच, त्याची एक्स गर्लफ्रेंड, ब्राझिलियन मॉडेल आणि अभिनेत्री इझाबेल लिट, हिनंही या परिस्थितीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
एका इन्साग्राम पेजवर इझाबेल लिटचा फोटो अनुष्का, जर्मन व्लॉगर लिजलाज आणि अवनीत कौरसोबत पोस्ट करण्यात आलेला. काही महिन्यांपूर्वी अवनीत कौरनं पोस्ट केलेल्या एका फोटोलाही विराट कोहलीनं लाईक केल्यामुळे असाच गोंधळ झालेला. पण, त्यावेळी विराट कोहलीनं पोस्ट करुन इन्स्टाग्राम अल्गोरिदममुळे चुकून लाईक झाल्याचं सांगितलं होतं. हे सर्व फोटो पोस्ट करत एका पेजनं लिहिलं की, "विराट कोहलीबाबत एक गोष्ट कुणीही नाकारू शकत नाही, महिलांच्या बाबतीत त्यांची निवड अत्यंत दर्जेदार आहे..." कॅप्शनमध्ये पुढे असंही म्हटलं होतं की, "इझाबेल लिटपासून ते अनुष्का शर्मापर्यंत… उत्कृष्ट निवड ही त्याच्या 'ब्रँड'चा एक भागच..."

इझाबेलनं याच इन्स्टाग्राम पोस्टवर 'थकलेल्या चेहऱ्याचा इमोजी' पोस्ट केलाय. तसेच, त्यासोबत कमेंटमध्ये लिहिलंय की, "या गोष्टीला 12 वर्ष झालीत, तरीही हा विषय अजूनही सुरूच आहे... लोक हा विषय विसरून पुढे का जाऊ शकत नाहीत?"
विराट कोहलीनं बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत आपली लग्नगाठ बांधली. सध्या त्यांना दोन मुलं असून पॉवरफुल सेलिब्रिटी कपल्सपैकी हे एक कपल आहे. पण, अनुष्का शर्माला भेटण्यापूर्वी विराट आणि इझाबेल 2012 ते 2014 मध्ये एकमेकांना डेट केलेलं. सध्या इझाबेल विवाहित असून ती आपला पती आणि दोन मुलांसोबत कतारमधील दोहा इथे राहते. इझाबेल शेवटची 2019 मधील 'मिस्टर मजनू' या तेलुगू सिनेमात आणि त्यानंतर 2020 मधील 'वर्ल्ड फेमस लव्हर'मध्ये झळकली होती. त्यानंतर तिनं अद्याप कोणत्याही नव्या प्रोजेक्टची घोषणा केलेली नाही.