SAW vs INDW, 3rd T20i : टीम इंडियातून दोघींचा पत्ता कट, अमरावतीकर खेळाडूला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी
admin April 23, 2026 01:25 AM
[ad_1]

वुमन्स टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या आणि निर्णायक टी 20i सामन्यात विजेने विघ्न घातलं. वीजेमुळे टॉस आणि सामन्याला सुरुवात होण्यास विलंब झाला. नियोजित वेळेनुसार सामन्याला रात्री 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात तर 9 वाजता टॉस होणं अपेक्षित होतं. मात्र विजेने खोडा घातल्याने 45 मिनिटांच्या विलंबाने टॉस झाला. तर 30 मिनिटं उशिराने सामन्याला सुरुवात होणार असल्याची माहिती देण्यात आली. त्यानुसार रात्री 10 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. तर त्याआधी 9 वाजून 45 मिनिटांनी टॉस झाला. दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन लॉरा वॉल्वार्ड्ट हीने फिल्डिंगचा निर्णय घेत टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.

दोन्ही संघांकडून बदल

दक्षिण आफ्रिका आणि टीम इंडियाने प्लेइंग ईलेव्हनमध्ये प्रत्येकी 2-2 बदल केले आहेत. अयाबोंगा खाका आणि अनेके बॉश या दोघांना प्लेइंग ईलेव्हनमधून बाहेर करण्यात आलंय. तर त्यांच्या जागी अयांडा हलुबी आणि कायला रेनेके यांचा समावेश करण्यात आला आहे.

टीम इंडियातून कुणाचा पत्ता कट?

टीम इंडियाने प्लेइंग ईलेव्हनमधून श्री चरणी आणि डेब्युटंट अनुष्का शर्मा या दोघींना विश्रांती देण्यात आली आहे. तर अमरावतीकर भारती फुलमाळी आणि काश्वी गौतम यांचा समावेश करण्यात आला आहे.

दक्षिण आफ्रिका वुमन्स प्लेइंग ईलेव्हन : लॉरा वॉल्वार्ड्ट (कॅप्टन), सुने लुस, ताझमिन ब्रिट्स, ॲनेरी डर्कसेन, कायला रेनेके, क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लर्क, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर), आयंदा हलुबी, तुमी सेखुखुने आणि नॉनकुलुलेको मलाबा.

वुमन्स टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : शफाली वर्मा, स्मृती मंधाना, जेमिमाह रॉड्रीग्स, हरमनप्रीत कौर (कॅप्टन), भारती फुलमाळी, ऋचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, काशवी गौतम, अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील आणि रेणुका सिंग ठाकुर.


[ad_2]
Source link
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.