पहलगाम हल्ल्यानंतर वर्षभरात Defence Stocks मध्ये स्फोटक तेजी; स्वदेशीच्या क्षमतेची बाजारात गर्जना
ET Marathi April 23, 2026 10:45 AM
२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झाले. या घटनेने प्रत्येक भारतीय हळहळला होता. परंतू या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने पाकिस्तानातील दहशतवादी तळं उद्धवस्त केली होती. भारताच्या संरक्षण सिद्धतेची आणि स्वदेशीच्या क्षमतेची छोटीशी झलक त्या युद्धात दिसून आली. त्यामुळे भारतीय शेअर बाजारातील संरक्षण निर्देशांकही वर्षभरात चांगला वधारला आहे.

या एका वर्षात गुंतवणूकदारांनी संरक्षण क्षेत्राकडे जे लक्ष दिले, त्याचा परिणाम आता आकड्यांमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. निफ्टी डिफेन्स इंडेक्सने गेल्या बारा महिन्यांत तब्बल ३१ टक्के परतावा दिला आहे. २२ एप्रिल २०२६ रोजी म्हणजे हल्ल्याच्या पहिल्या वर्धापनदिनी हा निर्देशांक दिवसभराच्या व्यवहारात १.३५ टक्क्यांनी वर बंद झाला. ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळी ६,५३९ वरून हा निर्देशांक ९,९१५ पर्यंत झेपावला, आणि सध्या तो ८,९४२ च्या आसपास घिरट्या घालतोय.

एका महिन्यात २१ टक्क्यांनी मजबूतगेल्या एका महिन्यात या निर्देशांकाने सुमारे २१ टक्क्यांची भरारी घेतली आहे, तर २०२६ या वर्षात आतापर्यंत सुमारे १५ टक्के परतावा मिळाला आहे. हे आकडे सांगतात की ही केवळ क्षणिक उत्साहाची लाट नाही. तर संरक्षण क्षेत्रातील मोमेंटम सातत्याने टिकून आहे.

कोणत्या शेअर्सनी सर्वाधिक झेप घेतली?

  • २२ एप्रिलच्या व्यवहारात अनेक संरक्षण व एरोस्पेस कंपन्यांच्या शेअर्समध्ये चांगलीच खरेदी दिसली.
  • ४ ते ६ टक्क्यांची तेजी : डायनॅमिक टेक्नॉलॉजीस, पारस डिफेन्स, डेटा पॅटर्न्स, सायंट डीएलएम आणि युनिकमेक एअरोस्पेस या कंपन्यांनी आघाडी घेतली.
  • ३ ते ४ टक्क्यांची वाढ : बीईएमएल आणि गार्डन रीच शिपबिल्डर्स यांनीही चांगला परतावा दिला.
  • १ ते २ टक्क्यांची मजबुती : झेन टेक्नॉलॉजीज, सोलर इंडस्ट्रीज, अस्ट्रा मायक्रोव्हेव, माझगाव डॉक, एमटीएआर टेक्नॉलॉजीज, कोचिन शिपयार्ड, भारत डायनॅमिक्स आणि हिंदुस्तान एरॉनॉटिक्स लि. यांनीही तेजी दाखवली.
  • या शेअर्सवर दबाव : मिश्र धातू निगम आणि भारत फोर्ज यांनी अत्यंत मर्यादित हालचाल केली, तर भारत इलेक्ट्रॉनिक्स किंचित घसरणीसह बंद झाला.


  • फक्त भावनेवर नाही : कंपन्यांचे फंडामेंटल्स भक्कमया क्षेत्रातील तेजी केवळ देशभक्तीच्या लाटेवर स्वार नाही; कंपन्यांची तितकीच भक्कम आहे.

    भारत इलेक्ट्रॉनिक्स : आर्थिक वर्ष २०२६ मध्ये या कंपनीने सुमारे ७५,००० कोटी रुपयांच्या नवीन ऑर्डर मिळवल्या आहेत. त्यामुळे एकूण ऑर्डर बुक तब्बल २.४ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. उलाढाल २६,७५० कोटी रुपयांच्या जवळपास राहिली, जी वार्षिक आधारावर १६ टक्क्यांहून अधिक वाढ दर्शवते.

    माझगाव डॉक शिपबिल्डर्स : केवळ नौदल आणि तटरक्षक दलाच्या प्रकल्पांपुरती मर्यादित न राहता, ही कंपनी आता हरित ऊर्जेवर आधारित व्यापारी जहाजांच्या बांधणीतही उतरली आहे. अलीकडेच शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सोबत सुमारे ३९ दशलक्ष डॉलरचा करार झाला, ज्यात मेथेनॉल दुहेरी इंधन जहाज तयार केले जाणार आहे.

    हिंदुस्तान एरोनॉटिक्स : आर्थिक वर्ष २०२६ मध्ये कंपनीचा महसूल सुमारे ३२,२५० कोटी रुपयांवर पोहोचला. मात्र पुरवठा साखळीतील अडचणी आणि जागतिक परिस्थितीमुळे LCA Mk1A व HTT-40 सारख्या विमानांच्या वेळापत्रकावर काहीसा परिणाम झाला.

    एमटीएआर टेक्नॉलॉजीज : एक वर्षात १२० टक्क्यांहून अधिकछोट्या आणि मध्यम कंपन्यांमध्ये एमटीएआर टेक्नॉलॉजीज ने थक्क करणारा दिला आहे. या वर्षात आतापर्यंत या शेअरने ११७ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे, तर गेल्या सहा महिन्यांत तो सुमारे १२० टक्क्यांनी उसळला आहे.

    एकूणच पहलगाम हल्ल्याने जे दुखणे दिले, त्याने देशाला संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याची जिद्द दिली. आणि शेअर बाजाराने या जिद्दीला परताव्याच्या भाषेत उत्तर दिले आहे.
    © Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.