Kolhapur politics news : विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या नऊ जागांपैकी भाजपच्या वाट्याला येणाऱ्या पाच जागांत इचलकरंजीचे माजी आमदार व भाजपचे माजी प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. मुंबईत आज रात्री उशिरा होणाऱ्या कोअर कमिटीच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.
माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह विधान परिषदेच्या नऊ सदस्यांची मुदत ३० एप्रिल रोजी संपत आहे. त्यामुळे या निवडीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. यात आमदारांच्या संख्याबळानुसार महायुतीत सहभागी भाजपच्या वाट्याला पाच, शिवसेना शिंदे पक्षाला दोन, तर एक जागा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वाट्याला जाणार आहे.
Ichalkaranji Textile : वस्त्रोद्योगासाठी गतवर्षीपेक्षा १० टक्के जादा तरतूद; व्याज अनुदान, वस्त्रोद्योग प्रकल्पांना मदतउर्वरित एक जागा महाविकास आघाडीला मिळेल. भाजपकडूनरिक्त होणाऱ्या जागांवर उमेदवार निश्चित करण्यासाठी आज प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक होत आहे. या बैठगीला मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, आशीष शेलार, पंकजा मुंडे, अतुल सावे, रावसाहेब दानवे उपस्थित रहाणार आहेत.