आयपीएल 2026 स्पर्धेत 1.60 कोटीत विक्री झालेल्या खेळाडूवर चप्पल घालून खेळण्याची वेळ, कारण की…
GH News April 23, 2026 08:17 PM

आयपीएल 2026 स्पर्धेत आरसीबीच्या ताफ्यात रूजू होण्यासाठी नुवान तुषाराने सर्वोतोपरी प्रयत्न केले. श्रीलंकन क्रिकेट बोर्डाच्या हातापाया पडला. कोर्टाचा दरवाजा ठोठावला. इतकंच काय केस मागे घेत श्रीलंकन क्रिकेट बोर्डाची माफी मागितली. पण त्याला काही आयपीएल स्पर्धेत खेळण्यासाठी ना हरकरत प्रमाणपत्र मिळालं नाही. आरसीबीने त्याच्यासाठी 1.60 कोटी रूपये मोजले होते. एनओसी न मिळाल्याने आता त्याचं 1.60 कोटींचं नुकसान होणार आहे. असं असताना नुवान तुषारा शाळेच्या मैदानात टेनिस बॉल क्रिकेट खेळताना दिसला. त्याची टेनिस बॉलने केलेली गोलंदाजी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नुवान तुषारा सध्या फिटनेसच्या तक्रारीमुळे क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. पण टेनिस बॉल क्रिकेट खेळताना पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. पण हा व्हिडीओ कधीचा हे सांगणं कठीण आहे. पण त्यावरून सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

आयपीएल स्पर्धेदरम्यान व्हायरल होत असलेल्या व्हिडीओनुसार, नुवान तुषारा हाफ पँटवर पाय चप्पल घालून गोलंदाजी करत आहे. त्याची गोलंदाजी पाहून अनेकांनी फिट असल्याचा प्रतिक्रिया दिल्या आहे. पण श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने घेतलेल्या फिटनेस टेस्टमध्ये नुवान तुषारा फेल गेला. श्रीलंक क्रिकेट बोर्डाच्या नियमानुसार, कोणत्याही खेळाडूला विदेशी लीग स्पर्धेत खेळण्यासाठी पहिल्यांदा फिटनेस टेस्ट पास करणं गरजेचं आहे. जर तसं केलं नाही तर त्याला परवानगी दिली जात नाही. नुवान तुषारा या टेस्ट फेल गेल्याने त्याला एनओसी नाकारण्यात आली.

आरसीबीची आयपीएल 2026 स्पर्धेतील कामगिरी चांगली आहे. आरसीबीने 6 पैकी 4 सामन्यात विजय मिळवला आहे. तर दोन सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. सध्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी असून 8 पैकी 4 सामन्यात विजय मिळवला तर प्लेऑफचं गणित सुटेल. असं असताना नुवान तुषाराच्या गैरहजेरीत आरसीबीचा गोलंदाजीचा एक पर्याय कमी झाला आहे. त्यामुळे इतर गोलंदाजांवर भार पडत आहे. नुवान तुषारा जगभरातील टी20 लीगमधील लोकप्रिय गोलंदाज आहे. त्याची गोलंदाजीची शैली लसिथ मलिंगासारखी आहे. त्याने 137 टी20 सामन्यात 174 विकेट काढल्या आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.