'आम्ही आंबेडकरवादी' संघटनेला पुरस्कार
esakal April 23, 2026 10:45 PM

‘आम्ही आंबेडकरवादी’ संघटनेला पुरस्कार

मालाड, ता. २३ (बातमीदार) : सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या ‘उत्तरदायित्व फाउंडेशन’ने आपला पहिला सामाजिक उत्तरदायित्व पुरस्कार देण्यासाठी ‘आम्ही आंबेडकरवादी’ या तरुणांच्या संघटनेची निवड केली आहे. आम्ही आंबेडकरवादी ही संघटना २०१७ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या काळात सलग तीन दिवस शिवाजी पार्क परिसरात स्वच्छतेच्या बाबतीमध्ये मुंबई महापालिकेला मदत करते. तसेच आंबेडकर अनुयायांना स्वच्छतेच्या बाबतीत प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कोणती खबरदारी घ्यावी, याचे मार्गदर्शनही करत असते. शनिवारी (ता. २) सायंकाळी ५.३० वाजता धुरू हॉल, छबिलदास शाळेसमोर, दादर पश्चिम येथे मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तरी परिवर्तनवादी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे सचिव ॲड. प्रणितकुमार म्हस्के यांनी केले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.