Vidhan Parishad Election : सध्या राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीची चर्चा आहे. राज्यात एकूण 9 जागंसाठी निवडणूक होणार असून 12 मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी कोणाला उमेदवारी द्यावी, यासाठी सर्वच पक्षांत खल सुरू आहे. महाविकास आघाडीतही उमेदवारीवरून खलबतं सुरू आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नुकतेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेची निवडणूक लढवावी, अशीच भूमिका महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि काँग्रेसची आहे. असे असतानाच आता सपकाळ यांनी ठाकरेंच्या भेटीनंतर सूचक विधान केले आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकारणात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.
तिन्ही पक्ष एकत्र बसतील त्यानंतर…महाविकास आघाडीतील घटकपक्ष म्हणून आमच्यात संवाद झाला. या पार्श्वभूमीवर आमची चर्चा झाली. भविष्यातील आव्हानांवरही आम्ही चर्चा केली. आजची राजकीय परिस्थिती, भूतकाळातील निर्णय यांचे सिंहावलोकन झाले. येणाऱ्या काळात तिन्ही पक्ष एकत्र बसतील आणि विधानपरिषदेविषयी निर्णय घेतला जाईल,, असे सपकाळ यांनी सांगितले.
ते विधानपरिषदेत जात असतील तर आनंदच आहेतसेच, उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारीबाबत आमची भूमिका तुमच्या सर्वांसमोर आहे. राज्यसभेच्या निवडणुकीच्या अगोदरपासून आमची हीच भूमिका राहिलेली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत आम्हाला उमेदवारी मिळू शकली नाही. मात्र उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचा चेहरा आहेत. ते विधानपरिषदेत जात असतील तर आम्हाला आनंदच आहे. आम्ही याबाबत अगोदरच सांगितलेले आहे, असेही सपकाळ यावेळी म्हणाले.
सुप्रिया सुळे यांचेही ट्वीटविधानपरिषदेच्या उमेदवारीबाबत आम्ही या बैठकीत चर्चा झाली नाही. भविष्यात कशी वाटचाल राहिली पाहिजे, यावर आम्ही चर्चा केली. उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेविषयी मी भाष्य करणे योग्य नाही. त्यांच्या उमेदवारीबाबत तेच बोलतील, असे बोलत काँग्रेसही उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारीबाबत अनुकूल असल्याचे त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले. दरम्यान, याआधी खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील ट्वीट करत उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेची निवडणूक लढवावी, अशी भूमिका मांडली. त्यामुळे आता नेमकं काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.