सलमान खानच्या 'या' सिनेमाचं अंडरवर्ल्ड कनेक्शन; दिग्गज दिग्दर्शकाच्या दाव्यानं खळबळ, तुम्ही पाहिलाय?
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क April 24, 2026 09:43 AM

Salman Khan Movie Underworld Connection: बॉलिवूडचं जग (Bollywood World) जेवढं झगमगतं आणि ग्लॅमरस दिसतं, तितकीच अंधारात बुडालेली त्याची दुसरी बाजू आहे. अनेकजण इथे स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात, काहींच्या हाती यश येतं, पण काहीजण अपयशाच्या गर्तेत पार बुडून जातात. बॉलिवूडचे (Bollywood News) आजवर आपण अनेक किस्से ऐकलेत. काही अभिनेता, अभिनेत्रींनी केलेल्या संघर्षाचे, तर काही त्यांच्यावर ओढवलेल्या प्रसंगाचे. पण, आज आम्ही तुम्हाला एक वेगळाच किस्सा सांगणार आहोत. हा किस्सा आहे, थोडासा रंजक आणि खूप मोठ्या प्रमाणावर धडकी भरवणारा. बॉलिवूडला 'सत्या' सारखी कल्ट फिल्म देणारा दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Director Ram Gopal Varma) यांनी स्वतः हा किस्सा सांगितलाय. राम गोपाल वर्मा यांनी सलमान खानच्या (Salman Khan) एका सिनेमाबाबत खूप मोठा आणि धक्कादायक दावा केला आहे. त्यांनी सांगितलंय की, सलमान खान स्टारर 'चोरी चोरी चुपके चुपके' (Chori Chori Chupke Chupke) हा फक्त रोमँटिक सिनेमा (Romantic Movie) नव्हता, तर यामागे अंडरवर्ल्डचं (Underworld) सावट होतं. त्या काळात सिनेसृष्टी आणि अंडरवर्ल्ड यांच्यातील गुंतागुंतीचे संबंध या घटनेतून दिसून येतात.

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) यांनी सांगितलं की, 'चोरी चोरी चुपके चुपके' सिनेमाचे फायनान्सर भरत शाह यांच्याकडे एक व्यक्ती आली आणि त्यानं स्वतःकडे सलमान खान यांच्या तारखा असल्याचा दावा केला. त्या व्यक्तीचं सिनेसृष्टीत मोठं नाव नसतानाही त्यानं एवढा विश्वास निर्माण केला की, पुढे त्याच्या चर्चा सुरू झाल्या. खात्री करण्यासाठी सलमान खान यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनीही होकार दिला आणि सिनेमाचा पाया रचला गेला. 

अंडरवर्ल्ड कनेक्शनचा उलगडा (Bollywood Underworld Connection)

सिनेमाच्या निर्मिती संदर्भातील घडामोडींमध्ये खरा ट्वीस्ट तेव्हा आला, जेव्हा सिनेमाचे निर्माते नाझिम रिझवी यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्यांचं नाव छोटा शकीलशी जोडलं जात असल्याचंही समोर आलं. सुरुवातीला भरत शाह यांना हे केवळ व्यावसायिक व्यवहार असल्यासारखं वाटत होतं, पण हळूहळू परिस्थिती बदलू लागली. इंडस्ट्रीतील लोकांना फोन येऊ लागले आणि पैशांची मागणीही वाढू लागली, ज्यामुळे संपूर्ण प्रकरण अधिकच गंभीर बनलं.

प्रकरण पुढे कसं चिघळत गेलं? 

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी केलेल्या दाव्यानुसार, एका मोठ्या उद्योगपतीकडून सुरुवातीला 5 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती, जी नंतर 2 कोटींवर आणली गेली. या सगळ्या प्रकरणात भरत शाह यांच्याकडेही मदतीची अपेक्षा ठेवण्यात आली. त्यांना वाटलं की, ते परिस्थिती हाताळू शकतील, मात्र गोष्ट उलटीच झाली. पोलिसांना संशय आला की, या सगळ्यामागे अंडरवर्ल्डचा हात आहे. याच संशयावरून भरत शाह यांनाही अटक झाली आणि त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. मात्र, त्यांनी आपण फक्त मदतीसाठी पुढे आलो होतो, असं स्पष्टीकरण दिलं.

सिनेमा यशस्वी, पण कथा कायम चर्चेत

2001 साली प्रदर्शित झालेला 'चोरी चोरी चुपके चुपके' हा सिनेमा अब्बास-मस्तान यांनी दिग्दर्शित केला होता. या सिनेमात सलमान खान, राणी मुखर्जी आणि प्रीती झिंटा मुख्य भूमिकेत होते. सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्यानं बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाईसु्द्धा केली. सुमारे 13 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या सिनेमानं जवळपास 37 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. मात्र, सिनेमाच्या यशासोबतच त्यामागची ही अनोखी आणि धक्कादायक कहाणी आजही चर्चेत आहे.

Bollywood Actress Struggle Life: कधीकाळी ज्या अभिनेत्याची हिरोइन बनली, 5 वर्षांनी खऱ्या आयुष्यात त्यांच्याच स्टार मुलासोबत थाटला संसार, आता लेक बॉलिवूडचा हँडसम हंक; ओळखलं का कोण?

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.