आता आली डोनाल्ड ट्रम्प यांची बुद्धी ताळ्यावर, भारताबद्दल वादग्रस्त विधानानंतर थेट म्हणाले, भारत हा एक..
GH News April 24, 2026 11:10 AM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कधी काय भाष्य करतील आणि कधी काय निर्णय घेतील याचा अजिबात नेम नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला नरकाचा दरवाजा म्हणणारी पोस्ट सोशल मीडियावर रिपोस्ट केल्याने खळबळ उडाली. डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्या वादाला तोंड फोडले. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला नरकाचा दरवाजा म्हटल्याने सडकून टीका त्यांच्यावर झाली. आपण टीकेचे धनी ठरल्याचे लक्षात येताच डोनाल्ड ट्रम्प यांनी सावरासावर करण्याचा मोठा प्रयत्न केला. काही तासांपूर्वी भारताला नरकाचा दरवाजा म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना अचानक भारतासोबतची मैत्री आठवली. भारत आणि अमेरिकेचे किती जास्त जुने संबंध आहेत, यावर बोलताना दिसले. भारतासोबतच त्यांनी चीनलाही नरकाचा दरवाजा म्हटले. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला नरकाचा दरवाजा म्हटल्यानंतर भारतातील विरोधी पक्षांकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

वाद वाढत असल्याचे लक्षात येताच डोनाल्ड ट्रम्प यांनी नवी दिल्लीतील अमेरिकी दूतावासाकडून एक निवेदन जारी केले. त्यात म्हटले की, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला महान देश म्हटले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल पुढे बोलत म्हटले की, भारत हा एक अद्भुत देश आहे. आमचे त्यांच्यासोबत अत्यंत चांगले संबंध आहेत. टीकेची धनी ठरल्याचे लक्षात येताच डोनाल्ड ट्रम्प यांना भारतासोबतची मैत्री आठवली.

आशियातील काही देशातील लोक अमेरिकेत येतात आणि 9 महिन्यात बाळाला जन्म घालतात. ज्यानंतर फक्त 9 महिन्यात ते बाळ अमेरिकन नागरिक होते, ज्यामध्ये भारत आणि चीनचा उल्लेख करत नरकाचा दरवाजा म्हटले होते, ही पोस्ट डोनाल्ड ट्रम्प यांनी रिपोस्ट केली. डोनाल्ड ट्रम्प यांनी ही पोस्ट रिपोस्ट केल्यानंतर एकच मोठी खळबळ उडाली. त्यापूर्वी दोन ते तीन दिवसांपूर्वीच नरेंद्र मोदी आणि भारताचे काैतुक करताना डोनाल्ड ट्रम्प दिसले.

अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील वाढलेली मैत्री भारतासाठी नक्कीच मोठी डोकेदुखी ठरत आहे. इराणसोबतच्या युद्धात एकही देश अमेरिकेच्या मदतीकरिता पुढे येत नव्हता. शेवटी पाकिस्तान या युद्धात मध्यस्थी करण्यासाठी पुढे आला. पाकिस्तानकडून युद्धात मध्यस्थी केली जात आहे. मात्र, त्यांना फार काही यश मिळत नाही. इराण आणि अमेरिका युद्धामुळे जग संकटात आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.