Mumbai News : विल्सन जिमखान्यानंतर (Wilson Gymkhana) आणखी एक वस्तीगृह जैन इंटरनॅशनल ऑरगॅनायझेशनला (JIO) देण्याचा मुंबई महानगर पालिकेने घाट घातल्याचे समोर आलं आहे. जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनने (Jain International Organisation) कांदिवली येथील 17 हजार 679.600 चौ. फु. भूखंड महापालिका लिजवर देण्याससंदर्भात सुधार समितीच्या बैठकीत प्रस्ताव मांडण्यात आला आहे. आर दक्षिण विभागातील कांदिवली येथील आकुर्ली येथे तळमजला + 5 मजले इमारतीमधील जागेवर 18 वर्षावरील विद्यार्थींकरिता बांधण्यात आलेल्या वस्तीगृहाचे व्यवस्थापन आणि प्रचलन करण्यासंदर्भात हा प्रस्ताव असल्याची माहिती आहे. तर मुंबई महानगर पालिकेकडून (Brihanmumbai Municipal Corporation) जैन इंटरनॅशनल ऑरगॅनायझेशन (Jain International Organisation) संस्थेची नियुक्ती करण्यासंदर्भात सुधार समितीमध्ये हा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती आहे.
Mumbai News : महानगर पालिका दर महा प्रति चौ. फु. 5 रुपये दर आकारणार
मिळालेल्या माहितीनुसार, मुलींसाठी बांधलेले वसतिगृहाची देखभाल जैन इंटरनॅशनल ऑरगॅनायझेशन ही संस्था करणार असून याचे महानगर पालिका दर महा प्रति चौ. फु. 5 रुपये दर आकारणार आहे. याप्रमाणे मुंबई महानगर पालिका महिन्याला 88 हजार 400 रु जैन इंटरनॅशनल ऑरगॅनायझेशन वसुल करणार आहे. याअगोदर मरीन ड्राइव्ह येथील विल्सन जिमखाना जैन इंटरनॅशनल ऑरगॅनायझेशनला (JIO) देण्यावरून वाद झाला होता. हे प्रकरण ताजे असतानाच विल्सन जिमखान्यानंतर आणखी एक वस्तीगृह जैन इंटरनॅशनल ऑरगॅनायझेशनला (JIO) देण्याचा मुंबई महानगर पालिकेच्या निर्णयाने नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.
Mumbai News : पालिकेकडून 30 वर्षाच्या लिजवर भूखंड देण्याचा प्रस्ताव
दरम्यान, यासोबत अनेक सामाजिक संस्थाना माफक दरात भूखंड देण्याचे प्रस्ताव आजच्या सुधार समितीच्या बैठकीत आले आहेत. यात जवळपास 10 ते 12 विविध विभागातील भूखंड विविध संस्थांना देण्यासंदर्भात आज प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याची माहिती आहे. यामध्ये डायलेसिस सेंटर, सिटीस्कॅन, MRI, सोनोग्राफी, कॅथलॅब यांची उभारणी करण्यासाठी पालिकेकडून 30 वर्षाच्या लिजवर भूखंड देण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढे नेमकं काय होतं, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या