सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात उन्हाचा तडाखा जाणवत आहे. राज्यात एकीकडे तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे गेल्याने निसर्गासह मानवी जीवनावरही त्याचे परिणाम होताना दिसत आहे. या कडक उन्हाचा फटका आपल्या अंगणातील तुळशीलाही बसतो. योग्य काळजी घेऊनही अनेकदा तीव्र उष्णतेमुळे तुळस सुकते किंवा कोमेजते. हिंदू धर्मात तुळस वाळणे अशुभ मानले जात असले, तरी वास्तुशास्त्रानुसार वाळलेल्या तुळशीचा वापर करून आपण जीवनातील अनेक संकटांवर मात करू शकतो.
जर तुमची तुळस वाळली असेल, तर निराश होऊन ती फेकून देऊ नका. वाळलेल्या तुळशीच्या लाकडात आणि पानांमध्ये सकारात्मक ऊर्जेचा साठा असतो, जो तुमच्या घरातील वास्तुदोष आणि आर्थिक समस्या दूर करण्यास मदत करतो.
घराला दृष्ट लागण्यापासून वाचवतेअनेकदा घरात विनाकारण भांडणे होतात किंवा घरातील सदस्यांना सतत नैराश्य जाणवते. अशा वेळी वाळलेल्या तुळशीच्या लाकडाचा एक लहान तुकडा घ्यावा. तो स्वच्छ लाल कापडात गुंडाळून त्याला पवित्र धाग्याने बांधावे. हे गाठोडे घराच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीवर वरच्या बाजूला मध्यभागी टांगावे. वास्तुशास्त्रानुसार, हा उपाय घराचे नकारात्मक शक्तींपासून रक्षण करतो. तसेच घराभोवती संरक्षक कवच निर्माण करतो.
आर्थिक चणचण दूर करतेजर तुम्ही कठोर परिश्रम करत असाल, पण तरीही पैशांची बचत होत नसेल किंवा घरात पैसा टिकत नसेल, तर हा उपाय करावा. वाळलेल्या तुळशीच्या झाडाचे मूळ किंवा फांदीचा एक छोटा तुकडा घ्यावा. तो गंगाजलाने स्वच्छ धुवून शुद्ध करावा. त्यानंतर एका पिवळ्या कापडात तो तुकडा ठेवून त्याची छोटी पोटली बनवावी आणि तुमच्या तिजोरीत किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवावी. यामुळे धनाची आवक वाढते आणि विनाकारण होणारे खर्च थांबतात, अशी धार्मिक मान्यता आहे.
प्रलंबित कामांसाठी खासभगवान विष्णूंच्या पूजेत तुळशीला सर्वोच्च स्थान आहे. जर तुमची अनेक कामे बराच काळ रेंगाळली असतील, तर कोणत्याही एकादशीला किंवा गुरुवारी संध्याकाळी शुद्ध तुपाचा दिवा लावावा. या दिव्यात वाळलेल्या तुळशीचा एक छोटा तुकडा टाकावा. याला ‘तुळशी काष्ठ दीप’ म्हणतात. हा दिवा लावल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात. तसेच अडकलेली कामे पूर्ण होण्यास मार्ग मोकळा होतो.
हे आवर्जून लक्षात ठेवा( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)