Nashik IT Company Molestation Case: नाशिकमधील टीसीएस लैंगिक छळ आणि धर्मांतरण प्रकरणाने राज्यच नाही तर देश हादरला आहे. या कंपनीतील पीडित तरुणी आणि काही पुरुषांवर धर्मांतरणासाठी मोठा दबाव आणल्याचे समोर आले आहे. हिंदू देवी-देवतांना शिव्या देणे, टिकली, कुंकू लावल्यास त्रास देणे, अश्लील शेरेबाजी, अश्लील पासवर्ड ते सामूहिक पार्टीच्या नावाखाली थेट शारीरिक अत्याचार केल्याचे धक्कादायक खुलासे समोर आले आहेतच. पण आता मोठा खळबळजनक गौप्यस्फोट एका पीडितेने केला आहे. धर्मांतरणासाठी अजमेर कनेक्शन समोर आले आहे. धर्मांतरणासाठी मोठे रॅकेट सक्रिय असल्याचा सुगावा लागला आहे.
अजमेरचा मौलाना कोण?
टीसीएस कंपनीत काम करणाऱ्या सहाव्या पीडितेने हा खुलासा केला आहे. ती गेल्या 11 वर्षांपासून नाशिकमधील या कंपनीत बीपीओमध्ये काम करत आहे. तर गेल्या सात वर्षांपासून ती नाशिक युनिटमध्ये टीम लीडर म्हणून काम करत आहे. सध्या ती ऑपरेशन्स विभागात 27 कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करते. तिच्याकडे इतका प्रदीर्घ अनुभव आहे. कंपनीत वरिष्ठांपर्यंत तिची ओळख आहे, तरी तिला लैंगिक छळाचा सामना करावा लागला आहे. हा सर्व प्रकार अनेक वर्षांपासून सुरू आहे. वरिष्ठांकडे तक्रार करूनही त्यांनी दुर्लक्ष केल्याचे तिचे म्हणणे आहे. त्यामुळेच आरोपींचे फावल्याचा दावा करण्यात येत आहे. आरोपी तिच्यावर धर्मांतरणासाठी वारंवार दबाव टाकत होते. त्यासाठी अजमेरचा एक मौलना भेटायला येणार होती. आरोपी या मौलाना भेटण्यासाठी तिच्यावर सातत्याने दबाव आणत होते. आता हा मौलाना कोण याचा तपास करण्याची गरज आहे.
मौलानाला भेट, तुला अपत्य होईल
पीडितेचा गर्भपात झाला. काही दिवसांनी ती या फेब्रुवारी 2026 मध्ये कंपनीत कामाला आली. दुपारी जेवताना आरोपी तौसीफ अत्तार तिला भेटला. तिने गर्भपाताची माहिती दिली. तेव्हा आरोपीने तिच्यावर अश्लील कमेंट केली. त्याचवेळी अजमेरच्या मौलानाला भेट तुला अपत्य होईल अशी अश्लाघ्य टिप्पणी केली. त्याने तिच्यावर यापूर्वी सु्द्धा धर्मपरिवर्तनासाठी दबाव आणल्याचा आरोप आहे.
आरोपी तौसिफ आणि या प्रकरणातील आरोपी तिच्यासह मुलींच्या शरीरावरून नजर फिरवायचे. बैठकी दरम्यान मुद्दामहून शारीरिक स्पर्श करायचे. तर मुलींच्या वैवाहिक आयुष्यात काय सुरू आहे. यामध्ये ते सारखे दखल द्यायचे. त्यावरून टिप्पणी करायचे. याविषयीची तक्रार करूनही वरिष्ठांनी काहीच दखल न घेतल्याचा आरोप पीडितेने केला आहे. त्यामुळे याप्रकरणात कंपनीतील वरिष्ठांनाही आरोपी करण्याती मागणी केल्या जात आहेत. त्यांचाही या धर्मांतरण आणि लैंगिक शोषणाला मूक संमती होती का, असा सवाल विचारल्या जात आहे. कंपनीतील एका विशिष्ट समुदायाला इतके धार्मिक स्वातंत्र्य का देण्यात आले याचा खुलासा कंपनीने करणे गरजेचे असल्याची ओरड होत आहे.