Ginny Weds Sunny 2 Movie Review and Rating: आजच्या घडीला सिनेमा खूप पुढे गेला आहे. ओटीटीवर जगभरातील (Entertainment) शो पाहायला मिळत आहे. आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' या चित्रपटाने सिनेसृष्टीला एका नवीन उंचीवर नेऊन ठेवलं आहे. दरम्यान, काही चित्रपट हे आऊटडेटेड वाटतात. असे चित्रपट पाहून असं वाटतं की आपण टाईम मशीनने मागे गेलो आहे. प्रत्येक चित्रपट आता 'धुरंधर' होऊ शकत नाही. अलिकडेच Ginny Weds Sunny 2 हा चित्रपट रिलीज झाला. हा सिनेमा नेमका आहे तरी कसा? जाणून घेऊयात.
कथा: 24 एप्रिल रोजी रिलीज झालेला रोमँटिक कॉमेडी सिनेमा प्रेक्षकांच्या मनात उतरण्यास यशस्वी ठरला. सनी आणि गिन्नी दोघांचेही बॅकग्राऊंड वेगवेगळे असतात. दोघांचेही लग्न होत नाही. त्यांच्या आयुष्यात असं काही घडतं, ज्यामुळे त्यांचं लग्न होत नाही. त्यांच्या आयुष्यावरही याचा थेट परिणाम होतो. दोघेही एकमेकांना भेटतात. काही खोट्या खऱ्या गोष्टींनंतर त्यांचं लग्न होतं. परंतु, खोटं हे किती काळ टिकणार. त्यानंतर नेमकं काय होतं, हेच या चित्रपटातून दाखवण्यात आलं आहे.
हा सिनेमा खूप जुन्या प्रकाराचा वाटतो. कथेत काही नाविन्य नाही. सादरीकरण पण जुने आहे. चित्रपटातील विनोदही कंटाळवाणे वाटते. कुठेही हसू येत नाही. असा एकही प्रसंग नाही की, तुम्हाला या चित्रपटाचा आनंद घेता येईल. कलाकारांनी उत्तम काम केलं आहे. परंतु, स्क्रिप्टमध्ये इतका दम नसेल तर, तुम्ही करणार तरी काय? चित्रपटाचा म्युझिक ठीकठाक आहे.
हा चित्रपट प्रेक्षकांचा फार मनोरंजन करु शकत नाही, ना या चित्रपटातून प्रेक्षकांना कोणता संदेश मिळतो. Ginny Weds Sunny 2 या चित्रपटाची अद्याप कोणतीही विशेष चर्चा झालेली नाही. चित्रपटाचा ट्रेलर किंवा गाणी व्हायरल झालेली नाही. दरम्यान, चित्रपट पाहिल्यानंतर कोणतीही चर्चा होईल, अशी आशा नाही.
अविनाश तिवारीने हा एक कमाल अॅक्टर आहे. त्यानं आतापर्यंत लैला मजून, ओ रोमिया सारख्या चित्रपटात उत्तम कामगिरी केली. ओ रोमिया चित्रपटात त्यानं अॅक्टिंगमध्ये शाहिद कपूरलाही पछाडलं होतं. दरम्यान, या सिनेमात त्याच्यासारख्या अभिनेत्याची जादू चालली नाही. हा चित्रपट पाहण्याचा एकमेक कारण म्हणजे, मेधा शंकर.
मेधा शंकर ही अभिनेत्री सुरेख आहे, तसेच अभिनयातही तिला तोड नाही. हा चित्रपट कदाचित इतका चांगला नसेल, पण मेधाला याचा नक्कीच फायदा होईल. या चित्रपटातील इतर कलाकारांनी उत्तम काम केलं आहे.
Ginny Weds Sunny 2 या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रशांत झा यांनी केलं आहे. त्यांची चित्रपट डायरेक्ट करण्याची जुनी पद्धत आहे. हा सिनेमा इतका मनोरंजक वाटत नाही. एकूणच हा सिनेमा पाहण्यासारखा नाही.
रेटिंग - 1.5 स्टार्स
महत्त्वाच्या इतर बातम्या:
'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये मोठा ट्विस्ट; बापूजींचा मृत्यू झाला? जेठालालचं रडू थांबेना