ओपनर साई सुदर्शन याने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 34 व्या सामन्यात यजमान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसमोर 206 धावांचं आव्हान ठेवलं आहे. गुजरातने बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 205 धावा केल्या. बंगळुरुने चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आतापर्यंत स्पर्धेच्या इतिहासात एकूण 49 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आरसीबीला गुजरातला पराभूत करुन चिन्नास्वामीत विजयी अर्धशतक करण्याची संधी आहे. आता आरसीबी घरच्या मैदानात विजय मिळवून अर्धशतक झळकावणार की गुजरात चिन्नास्वामी स्टेडियममध्ये एकूण तिसरा सामना जिंकणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार याने टॉस जिंकला. रजतने टॉस जिंकून गुजरातला बॅटिंगसाठी भाग पाडलं. गुजरातच्या पहिल्या पाचही फलंदाजांनी अप्रतिम बॅटिंग केली. त्यामुळे गुजरातला 200 पार मजल मारता आली. मात्र गुजरातला द्विशतकापर्यंत पोहचवण्यात साई सुदर्शन याने प्रमुख आणि सर्वाधिक योगदान दिलं. साईने आरसीबी विरुद्ध शतक ठोकलं. साईने त्याच्या कारकीर्दीतील हे तिसरं आणि या मोसमातील पहिलं शतक झळकावलं. साईने गुजरातसाठी सर्वाधिक धावा केल्या.
साईने 58 बॉलमध्ये 172.41 च्या स्ट्राईक रेटने कट टु कट 100 धावा केल्या. कॅप्टन शबमन गिल याने 32 धावांचं योगदान दिलं. शुबमनने 24 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 2 फोर लगावले. विकेटकीपर आणि तिसऱ्या स्थानी बॅटिंगसाठी आलेल्या जोस बटलर याने 16 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 1 फोरसह 25 रन्स केल्या. तर वॉशिंग्टन सुंदर आणि जेसन होल्डर या दोघांनी अखेरच्या क्षणी प्रमुख भूमिका बजावत छोटेखानी मात्र निर्णायक खेळी केली. सुदंरने 12 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 1 फोरसह नॉट आऊट 19 रन्स केल्या. तर गुजरातसाठी डेब्यू करणाऱ्या जेसन होल्डरने महत्त्वपूर्ण नाबाद 23 धावांची खेळी केली. होल्डरने या खेळीत 2 सिक्स आणि 1 फोर लगावला.
लाईव्ह स्कोअरकार्ड
आरसीबीकडून एकूण 6 जणांनी बॉलिंग केली. त्यापैकी तिघे विकेट मिळवण्यात अपयशी ठरले. तर तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली. भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड आणि फिरकीपटू सूयश शर्मा या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली. तर रसिख सलाम डार, कृणाल पंड्या आणि रोमरिया शेफर्ड हे तिघे विकेट मिळवण्यात अपयशी ठरले.