Nagpur : नागपूर जिल्ह्यातील उमरेड (Nagpu Umred) येथे स्विमिंग टँकमध्ये बुडून एका अभियांत्रिकी विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तुषार ओमकार (वय 20) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो नागपूरमधील एका खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयात द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता. या घटनेमुळं सर्वत्र हळहळ व्यक्त होताना दिसत आहे. दरम्यान, या प्रकरणी उमरेड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तुषार गेल्या काही दिवसांपासून उमरेडमधील नगर परिषद मालकीच्या स्विमिंग टँकमध्ये पोहण्याचा सराव करत होता. काल सकाळी सुमारे 6 वाजून 30 मिनीटांनी तो आपल्या भावासोबत स्विमिंग टँकवर गेला होता. पोहत असताना तो पाण्यात बुडाल्याचे कुणालाही तत्काळ लक्षात आले नाही. सुमारे तासाभरानंतर एका व्यक्तीला पाण्याखाली काहीतरी लागल्याची जाणीव झाल्यानंतर शोध घेण्यात आला असता तुषार बुडाल्याचे उघड झाले. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. स्विमिंग टँक व्यवस्थापनावर निष्काळजीपणाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. योग्य सुरक्षा व्यवस्था आणि देखरेख नसल्यामुळे हा अपघात घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान, उमरेड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
मुंबईच्या विक्रोळीत भीषण अपघाताची घटना घडली आहे. यामध्ये मुंबई महानगर पालिकेच्या तरुण पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. डॉ. निवास थंगवेलू यादव असं या 31 वर्षीय डॉक्टरचं नाव आहे. विक्रोळीच्या गांधीनगर जंक्शन इथं अपघाताची घटना घडली आहे. दुचाकीवरुन जात असताना त्यांना मागून आयशर टेम्पोने धडक दिली. यामध्येच त्यांचा मृत्यू झाला.
डॉ. निवास यादव हे मानखुर्द च्या पशुवधगृहात गेले दहा ते बारा वर्षांपासून कर्तव्य करीत होते. गेल्याच वर्षी त्यांचे लग्न झाले होते. आज दुपारी ते त्यांच्या दुचाकीवरून विक्रोळी च्या गांधीनगर जंक्शन वरील पुलावरून जात असताना त्यांना मागून आयशर टेम्पो ने धडक दिली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यापूर्वी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी विक्रोळी पार्कसाईट पोलिसानी टेम्पो चालक गोविंद राजकुमार गिरी याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.