Sangli farmers protest : ‘प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असून, शेतकऱ्यांच्या जमिनीवर अधिकाऱ्यांना पाय ठेवू देणार नाही,’ असा इशारा कॉम्रेड धनाजी गुरव यांनी दिला. नवेखेड येथील विठ्ठल-रुक्मिणी सभागृहात आयोजित सभेत ते बोलत होते.
गुरव म्हणाले, ‘‘प्रस्तावित महामार्ग मसुचीवाडी, नवेखेड, जुनेखेड, बोरगाव, ईश्वरपूर, कामेरी, येडेनिपाणी, इटकरे, कुरळप, ऐतवडे खुर्द मार्गे कोल्हापूर जिल्ह्यात जाणार आहे. या मार्गाचे उपग्रहाद्वारे मापन करण्यात आले असले, तरी प्रत्यक्ष मोजणीसाठी अधिकारी शेतात आल्यास त्यांना शेतकऱ्यांचा रोष सहन करावा लागेल.’’
बी. जी. पाटील म्हणाले, ‘‘गरज नसताना शक्तिपीठ महामार्गाचा आग्रह धरण्याचे कारण काय? कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विरोध केल्यामुळे हा मार्ग वाळवा तालुक्यात वळवण्यात आला आहे. बागायती जमिनीमधून जाणाऱ्या या महामार्गामुळे हजारो एकर जमीन बाधित होऊन ती क्षारपड व पाणथळ होण्याचा धोका आहे. परिणामी शेतीचे मोठे नुकसान होईल, तसेच तालुक्यातील साखर उद्योगही अडचणीत येईल.’’
Shaktipeeth Highway Sindhudurg : ‘शक्तीपीठ महामार्ग’ सिंधुदुर्ग जिल्ह्यातून वगळला; राधानगरी मार्गे सिंधुदुर्गात आणण्याची मागणीयावेळी दिग्विजय पाटील, दलित महासंघाचे शंकर महापुरे, एच. के. पाटील, सुहास कदम, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भागवत जाधव, तसेच नवेखेडचे माजी सरपंच प्रदीप चव्हाण यांनीही मते मांडली.
ऋषिराज जाधव यांनी सूत्रसंचालन केले. सभेला नवेखेड, जुनेखेड, बोरगाव, मसुचीवाडीपरिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपसरपंच राजेंद्र पाटील, सादिक पाटील, राजेंद्र चव्हाण, सूरज चव्हाण, विजय पाटील, अजित हवलदार, भैरवनाथ कदम, हौसेराव जाधव, निवास पाटील, संताजी गावडे, सचिन नागरे, विश्वास गुजवटे, बाळासाहेब तेली, बाळासाहेब निकम यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.