Marathi Entertainment News : बॉलिवूडमध्ये अनेक टॅलेंटेड कलाकार होऊन गेले आहेत. त्यातीलच एक म्हणजे ज्येष्ठ अभिनेते दिनेश हिंगु . करण अर्जुन, हेरा फेरी सारख्या सिनेमांमध्ये काम करणाऱ्या दिनेश यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. प्रेक्षकांना खळखळून हसवणारे हे कलाकार सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत आहे.
दिनेश हिंगु सध्याचे वय 86 वर्षं आहे. त्यांनी अनेक वर्षं बॉलिवूडमध्ये, गुजराती आणि राजस्थानी सिनेमात काम केलं आहे. याशिवाय आजही ते कामासाठी इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहेत.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांच्या आर्थिक संघर्षाविषयी सांगितलं. ते म्हणाले की,"माझं वय 86 वर्षं आहे. मी अजूनही कधीकधी कामासाठी बाहेर जातो. काही दिवसांपूर्वी मी पडलो. त्यामुळे मला दुखापत झाली. आता जखम बरी झालीये पण डॉक्टरांकडे जाण्यासाठी मला पैशांची गरज आहे. "
View this post on InstagramA post shared by Manish Dhadholi (@manishdhadholi)
"डॉक्टर कधी 5 हजार तर कधी 6 हजार रुपये मागतात. कॅरेक्टर आर्टिस्टना तितके पैसे मिळत नाही. ब्लॅक अँड व्हाईट सिनेमांच्या काळापासून मी सिनेमात काम करतोय. मी गुजराती आणि राजस्थानी सिनेमांमध्येही काम केलं आहे. डॉक्टरांकडे जाण्यासाठी खिशात पैसे लागतात. त्यामुळे कोणी बोलावले तर आजही मी कामाला जातो." हा त्यांचा व्हिडीओ जुना आहे.
हा व्हिडीओ पुन्हा व्हायरल झाल्यावर अनेकांनी दिनेश यांच्या अवस्थेवर हळहळ व्यक्त केली. तर अनेकांनी त्यांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी केली. बॉलिवूडने त्यांना सपोर्ट करावा असंही अनेकांनी म्हटलं आहे.
दिनेश यांचा जन्म 13 एप्रिल 1940 मध्ये बडोदा येथे झाला. ते पारशी कुटुंबात जन्माला आले असून त्यांचं नाव दिनेश हिंगोरानी आहे. तकदीर सिनेमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यांनी निगेटिव्ह भूमिकेतून करिअरची सुरुवात केली. आजवर त्यांनी 300 हुन अधिक सिनेमांमध्ये काम केलं आहे.
तुंबाडची मंजुळामधील पहिलं गाणं प्रदर्शित; राहुल देशपांडे आणि आर्या आंबेकर यांनी केलंय स्वरबद्ध