Nagpur News: वडिलाचा मुलावर चाकूहल्ला; आईचा मोबाईल नंबर न दिल्याच्या कारणावरून संताप
esakal April 25, 2026 02:45 PM

नागपूर: आईचा मोबाईल नंबर न दिल्याच्या कारणावरून रागाच्या भरात वडिलांनी स्वतःच्या १६ वर्षीय मुलावर चाकूने हल्ला केला. ही घटना अजनी परिसरात उघडकीस आली. अजनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मानव नरेंद्र इंगळे (रा. हावरापेठ, अजनी) असे जखमी मुलाचे नाव असून वडील नरेंद्र वामनराव इंगळे (वय ५०)असे आरोपी वडिलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मानव हा १२ वीचा विद्यार्थी आहे. त्याच्या आई-वडिलामध्ये दोन महिन्यांपासून वाद सुरू असल्याने आई कोमल नरेंद्र इंगळे (वय ३६) नातेवाइकाकडे राहते.

ACB Trap Nagpur Corruption Case : नागपुरात जिल्हाधिकारी कार्यालयातला मोठा मासा जाळ्यात! 5 लाखांची लाच घेताना महसूल सहाय्यकाला रंगेहात पकडलं

बुधवारी रात्री साडेबाराच्या सुमारास आरोपी नरेंद्र इंगळे घरी आले. मुलाकडे आईचा मोबाईल नंबर मागितला. मात्र, मुलाने नंबर नसल्याचे सांगितल्याने वडील संतापले. त्यानंतर त्याने मुलावर २० हजार रुपये चोरी केल्याचा आरोप करत शिवीगाळ केली.

Premium|Minimalistic Living : पिसारा की पिसारा? वय, हौस आणि ‘क्यूट लिटिल युझलेस थिंग्स’च्या गर्दीत साधं, सुटसुटीत जगणं शक्य आहे का?

रागाच्या भरात नरेंद्रने स्वयंपाकघरातील चाकूने मुलावर वार केला. मुलाच्या डाव्या हाताच्या पंजाला तसेच कमरेवर चाकू लागला. आजी चंद्रभागा इंगळे यांनी आरडाओरडा केल्याने नागरिक आले.

त्यांनी नरेंद्रला पकडले. त्यामुळे मुलगा वाचला. मुलाने तत्काळ आईला फोन करून माहिती दिली. आईने त्याला रुग्णालयात दाखल केले. अजनी पोलिसांनी इंगळेविरुद्ध गुन्हा दाखल करीत ताब्यात घेतले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.