IPL 2026, RR vs SRH Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत शनिवारी (२५ एप्रिल) सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सला ५ विकेट्सने पराभूत केले आहे. या हंगामातील हैदराबादचा हा राजस्थानविरुद्धचा दुसरा विजय आहे.
हैदराबादच्या विजयात अभिषेक शर्मा आणि ईशान किशन (Abhishek Sharma - Ishan Kishan) यांनी मोलाचा वाटा उचलला. पण राजस्थानसाठी वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Sooryavanshi) केलेलं ३६ चेंडूतील शतक व्यर्थ ठरले.
या सामन्यात राजस्थानने २२९ धावांचे लक्ष्य हैदराबादसमोर ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग हैदराबादने १८.३ षटकात ५ विकेट्स गमावत पूर्ण केला.
Vaibhav Sooryavanshi चे दुसरे शतक! तब्बल १२ षटकारांचा पाऊस पाडत IPL मध्ये ऐतिहासिक कारनामा; १९ वर्षात पहिल्यांदाच असं घडलंहैदराबादकडून ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा सलामीला फलंदाजीला उतरले होते. मात्र हेडला पहिल्याच षटकात ६ धावांवर जोफ्रा आर्चरने बाद केले. पण त्यानंतर अभिषेकला ईशान किशनची साथ मिळाली. या दोघांनीही आक्रमक खेळ केला. या दरम्यान, राजस्थानकडून काही झेलही सुटले. अभिषेक आणि ईशान दोघांनीही अर्धशतकं पूर्ण करताना शतकी भागीदारी करत हैदराबादला विजयासाठी पाया रचून दिला.
दरम्यान अभिषेक अर्धशतकानंतर डनोवन फरेराच्या गोलंदाजीवर १० व्या षटकात बाद झाला. त्याने २९ चेंडूत ११ चौकार आणि १ षटकारासह ५७ धावांवर बाद झाला. त्याने ईशानसोबत १३२ धावांची भागीदारी केली, ज्यामुळे हैदराबादच्या विजयाच्या आशा उंचावल्या. तो बाद झाल्यानंतर काही वेळात १३ व्या षटकात जोफ्रा आर्चरने डनोवन फरेराच्या हातून त्याला झेलबाद केले. ईशाने ३१ चेंडूत ११ चौकार आणि ३ षटकारांसह ७४ धावा केल्या.
त्यानंतर हेनरिक क्लासेन आणि नितीश कुमार रेड्डी यांनी पुढचा डाव सांभाळत ५३ धावांची भागीदारी केली. मात्र हे दोघे १८ व्या षटकात ब्रिजेश शर्माच्या गोलंदाजीवर बाद झाले. क्लासेनने २४ चेंडूत २९ धावा केल्या, तर नितीशने १९ चेंडूत ३६ धावा केल्या. नंतर उर्वरित धावा सलील अरोरा आणि अनिकेत वर्माने पूर्ण केल्या आणि संघाला विजयापर्यंत पोहचवले.
राजस्थानकडून ८ जणांनी गोलंदाजी केली. यातील जोफ्रा आर्चर आणि ब्रिजेश शर्मा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या, तर डनोवन फरेराने १ विकेट घेतली.
तत्पुर्वी राजस्थान रॉयल्सने २० षटकात ६ बाद २२८ धावा केल्या. राजस्थानकडून वैभव सूर्यवंशीने ३७ चेंडूत ५ चौकार आणि १२ षटकारांसह १०३ धावा केल्या. तसेच ध्रुव जुरेलने ३५ चेंडूत ५१ धावांची खेळी केली. याशिवाय शेवटी डनोवन फरेराने १६ चेंडूत ३३ धावांची खेळी केली.
हैदराबादकडून इशान मलिंगाने २ विकेट्स घेतल्या. प्रफुल हिंगे, कर्णधार पॅट कमिन्स, साकिब हुसैन आणि नितीश कुमार रेड्डी यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
पाँइंट्स टेबलमध्ये मोठा बदलशनिवारी आयपीएल २०२६ मध्ये दोन सामने खेळवण्यात आले. यातील पहिल्या सामन्यात पंजाब किंग्सने दिल्ली कॅपिटल्सने दिलेले २६५ धावांचे भलेमोठे आव्हान पार करत ६ विकेट्सने विजय मिळवला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात हैदराबादने २२९ धावांचे लक्ष्य पार करत राजस्थान रॉयल्सला ५ विकेट्सने पराभूत केले.
त्यामुळे या दोन्ही सामन्यांनंतर आता पंजाबने ७ सामन्यांमधील ६ विजय आणि एक रद्द सामन्यासह १३ गुण मिळवत पाँइंट्स टेबलमध्ये पहिला क्रमांक आणखी भक्कम केला आहे. दिल्ली कॅपिटल्सचा मात्र हा ७ सामन्यांतील चौथा पराभव ठरला. त्यामुळे दिल्ली ६ गुणांसह ६ व्या क्रमांकावरच कायम राहिलेत.
IPL 2026: 16 चौकार, 9 षटकार... KL Rahulचे दीडशतक! १९ वर्षात कोणत्याच भारतीयाला न जमकलेला पराक्रम, Orange Cap ही मिळवलीदरम्यान, हैदराबादचा हा हंगामातील पाचवा विजय होता. त्यामुळे ८ सामन्यांतील ५ विजयांसह त्यांनी १० गुण मिळवले आहेत. त्यामुळे ते आता तिसऱ्या क्रमांकावर पोहचले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचेही १० गुण आहेत, पण त्यांचा नेट रन रेट हैदराबादपेक्षा चांगला आहे. राजस्थान रॉयल्सचा मात्र ८ सामन्यांतील हा तिसरा पराभव ठरला आहे. त्यामुळे राजस्थान चौथ्या क्रमांकावर घसरले आहेत. त्यांचेही १० गुण आहेत. पण त्यांचा नेट रन रेट बंगळुरू आणि हैदराबादपेक्षा खराब आहे.
राजस्थानने सलग चार विजयांसह सुरुवात चांगली केली होती. पण नंतरच्या चार सामन्यांपैकी त्यांना केवळ एका सामन्यात विजय मिळवता आला आहे. तसेच हैदराबादबाबत मात्र हेच चित्र उलटे राहिले आहे. त्यांना पहिल्या चार सामन्यांत केवळ १ विजय मिळवता आला होता. पण नंतर त्यांनी सलग चार विजय मिळवले.