थोडक्यात बचावले डोनाल्ड ट्रम्प, खळबळ उडवणारी माहिती, हॉटेलमधील पार्टीवेळी काही क्षणातच हल्लेखोर..
GH News April 26, 2026 11:10 AM

वॉशिंग्टन डीसी येथील हिल्टन हॉटेलमध्ये गोळीबाराची घटना घडली. व्हाईट हाऊस कॉरस्पॉन्डंट्स डिनर या हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, त्यांच्या पत्नी, उपराष्ट्रपती आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारमधील महत्वाचे चेहरे यावेळी उपस्थित होते. सर्वकाही व्यवस्थित सुरू असताना मोठा गोळीबार झाला. स्फोटाचे आवाज ऐकू आली. डोनाल्ड ट्रम्प यावेळी उपस्थित पाहुण्यांना संबोधित करत असताना हा प्रकार घडला. सुरक्षा यंत्रणांना पूर्वसूचना मिळाली आणि काही क्षणांतच संपूर्ण वातावरण बदलले. यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांची सुरक्षा सर्वात महत्वाची होती. सुरक्षा यंत्रणांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुखरूप बाहेर काढले. या कार्यक्रमात असा काही प्रकार घडेल याची साधी कल्पनाही कुणी केली नव्हती. गोळीबाराची माहिती मिळताच डोनाल्ड ट्रम्प यांच्या भोवती मोठा खेरा सुरक्षा रक्षकांनी घातली.

सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांना खाली बसून हॉलमधून बाहेर काढण्यात आले. मिळालेल्या वृत्तानुसार, डोनाल्ड ट्रम्प भाषण करत असतानाच अचानक गोळीबाराचा आवाज आला.  तिथे उपस्थित असलेल्या यूएस सिक्रेट सर्व्हिसच्या एजंट्सनी तात्काळ कारवाई केली. बंदुकधारी सुरक्षारक्षकांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या दिशेने सर्वात अगोदर धाव घेतली. त्यानंतर एकच खळबळ उडाली.

ज्यावेळी हा गोळीबार होत होता, त्यावेळी लोक जीव वाचवण्याकरिता टेबलखाली जाऊन लपवताना दिसले. एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले. हल्लेखोराला सुरक्षा यंत्रणांनी ठार केल्याची माहिती मिळत आहे. हल्लेखोराच्या निशाण्यावर डोनाल्ड ट्रम्प होते. यावेळी एका सुरक्षारक्षकाने हल्लेखोराला रोखले असता त्याने गोळीबार करण्यास सुरूवात केली.

अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स आणि ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळातील अनेक सदस्यही त्या कार्यक्रमात उपस्थित होते. सुरक्षा यंत्रणांनी त्यांना तात्काळ बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी नेले. सर्वजण सुरक्षित असल्याचीही माहिती मिळत आहे. थोडीजरी चूक झाली असती तर मोठा अनर्थ घडला असता. डोनाल्ड ट्रम्प ज्या हॉटेलमध्ये होते, तिथे हा गोळीबार झाल्याने जगात एकच खळबळ उडाली. यासोबतच डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेत काही चूक झाली का? असाही प्रश्न यादरम्यान उपस्थित केला जात आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.