IPL 2026, RR vs SRH Marathi News: आयपीएल २०२६ स्पर्धेत शनिवारी (२६ एप्रिल) सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सला ५ विकेट्सने पराभूत करत मोठा धक्का दिला. पण असे असले तरी या सामन्यात १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Sooryavanshi) आक्रमक शतक सर्वांचे लक्ष वेधले आहे.
१५ व्या वर्षापर्यंतच वैभवने क्रिकेट विश्वात त्याची वेगळी छाप पाडली आहे. त्याने अनेक दिग्गजांना त्याची कौतुक करण्यास भाग पाडले आहे. आता सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सही (Pat Cummins) त्याचा फॅन झाला आहे. त्याने त्याच्याबद्दल सामन्यानंतर खास प्रतिक्रिया दिली आहे.
IPL 2026: तासाभरातच वैभव सूर्यवंशीकडून अभिषेक शर्माने हिरावली Orange Cap; शर्यतीत टॉप-५ फलंदाज कोण?वैभव सूर्यवंशीने हैदराबादविरुद्ध (Sunrisers Hyderabad) ३६ चेंडूत शतक केले होते. त्याने या सामन्यात ३७ चेंडूत ५ चौकार आणि १२ षटकारांसह १०३ धावांची खेळी केली.त्याने यशस्वी जैस्वालची (१०) विकेट लवकर गेल्यानंतर ध्रुव जुरेलसोबत शतकी भागीदारी केली होती. त्यामुळे हैदराबादने २० षटकात ६ बाद २२८ धावांचा डोंगर उभा केला होता.
वैभव आयपीएलमध्ये ४० पेक्षा कमी चेंडूत दोन शतके करणारा पहिलाच खेळाडू ठरला. त्याने गेल्यावर्षी गुजरात टायटन्सविरुद्ध ३५ चेंडूत शतक केले होते. तो आता आयपीएलमध्ये सर्वात कमी चेंडूत शतक करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे.याशिवाय एका आयपीएल डावात १२ षटकार मारणाराही तो पहिलाच भारतीय आहे.
IPL 2026, DC vs PBKS: '... तर आम्ही हरायला पाहिजे', २६४ धावा करूनही पराभव झाल्यानंतर अक्षर पटेल संघावर संतापलात्याच्या खेळाबद्दल बोलताना पॅट कमिन्सनेही सांगितले की तो वैभवचा चाहता बनला आहे. सामन्यानंतर कमिन्स म्हणाला, 'हो, मला वाटतं तो माझा नवा आवडता खेळाडू झाला आहे. तो चेंडूवर खूप जोरदार प्रहार करतो. त्याला पाहाताना छान वाटतं, मजा येते. त्यामुळे गोलंदाज म्हणून तुम्ही त्याच्याविरुद्ध खूपच अचूक असायला हवे, कारण तसं नसेल, तर तो मोठे शॉट्स खेळणार आहे. तो प्रभावी आहे. त्याच्या कारकिर्दीची सुरुवात मस्त झाली आहे. मला तो ज्याप्रकारे खेळतो, ते आवडतं, तो खेळात रंगत आणतो.'
कमिन्सने अनेक महिन्यांनंतर या सामन्यातून क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन केले. गेल्या काही काळापासून तो दुखापतीमुळे क्रिकेट खेळला नव्हता. त्याला टी२० वर्ल्ड कपला देखील मुकावे लागले होते. तो हैदराबादसाठी पहिल्या ७ सामन्यातही खेळला नव्हता. पण आता तो पूर्ण तंदुरुस्त झाला असून त्याने हैदराबादसाठी कर्णधार म्हणून पुनरागमन केले आहे.
या सामन्यात हैदराबादने २२९ धावांचे लक्ष्य १९व्या षटकात पूर्ण केले. हैदराबादसाठी ईशान किशनने ७४ धावांची खेळी केली, तर अभिषेक शर्माने ५७ धावांची खेळी केली. तसेच नितीश कुमार रेड्डीने १८ चेंडूत ३६ धावांचे, तर हेनरिक क्लासेनने २९ धावांचे मोलाचे योगदान दिले.