प्रसिद्ध कॉमेडियनचं दु:खद निधन; ICUमध्ये सुरू होते उपचार, मृत्यूचं कारण काय? शेवटची पोस्ट व्हायरल
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क April 26, 2026 05:13 PM

Comedian Raj Sharma Death News: मनोरंजन विश्वातून एक दु:खद बातमी समोर येत आहे.  प्रसिद्ध कॉमेडियन राज शर्मा यांचं निधन झालं आहे.  24 एप्रिल 2026 रोजी त्यांचा मृत्यू झाला.  50 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी एका कॉमेडी क्लबने  शेअर केली आहे.  राज शर्मा यांच्या निधनानंतर त्यांच्यावर श्रध्दांजली वाहिली जात आहे. अभिनेता आणि विनोदी कलाकार वीर दासने मित्र  राजच्या  निधनाबद्दल शोक व्यक्त करणारी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.  या पोस्टमध्ये त्यानं दोघांच्या भेटीची आठवण शेअर केली. 

वीर दासचा मित्र राज शर्मा यांचे निधन (Vir Das tribute to Raj Sharma emotional post)

वीर दासने राज शर्मा यांच्यासोबत घालवलेले अविस्मरणीय क्षण आणि आठवणींना उजाळा दिला. वीरने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, 'माझ्या कारकि‍र्दीत राज शर्माने लाफ फॅक्टरीमध्ये पहिली संधी मिळवून दिली होती. अमेरिकन मार्केटमध्ये स्पर्धा करण्यासाठी मी सक्षम आहे. त्याने मला एक उत्तम सल्ला दिला, तसेच  मनसोक्त हसवले. तो एक उत्तम विनोदी कलाकार होता.   त्याची प्रेक्षकांशी संवाद साधण्याची पद्धत वेगळी आणि विलक्षण वाटायची', असं वीरने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं.

'राजचे हे ऋण मला फेडायचे होते.  म्हणूनच 'विअर्डेस्ट पायजामा फेस्टिव्हल ' आणि 'डेस्टिनेशन अननोन' मध्ये त्याला सर्वप्रथम स्थान दिले', असंही वीर म्हणाला.  वीरने आपल्या पोस्टच्या शेवटी, 'राज तू एक चांगला मित्र होता.  एक विनोदी कलाकार म्हणून, कॉमेडियन्सच्या दुनियेतील  सर्वात मोठ्या कौतुकासह निरोप देतो.  तुझ्यानंतर पुन्हा परफॉर्म करणं अवघड आणि अशक्य वाटत आहे. राज शर्मा तुझ्या आत्म्यास शांती लाभो... '

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vir Das (@virdas)

राज शर्मा यांची शेवटची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल (Vir Das remembers Raj Sharma)

राज शर्मा यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पण त्यांनी रुग्णालयात असूनही काही पोस्ट शेअर केले होते. त्यांनी शेवटची पोस्ट 7 एप्रिल 2026 रोजी पोस्ट केली होती.  त्यांनी पोस्ट शेअर करत म्हटलं की, 'यावेळी फक्त 2 लिटर सलाईन लावले आहे. माझा अंदाज अडीच लिटरपेक्षा जास्त होते.  मला आयआर स्टाफसाठी जेवण तयार करायचं आहे. ईस्टर साजरा करणाऱ्या सर्वांना थेट ICUमधून ईस्टरच्या हार्दिक शुभेच्छा'.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

हॉरर - कॉमेडी 'भूत बंगला' सिनेमाची 100 कोटी कल्बमध्ये एन्ट्री; 'धुरंधर'ला टक्कर देणार?

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.