भक्ती आणि ध्यान साधनेमध्ये जपमाळेला अनन्यसाधारण महत्त्व असते. प्रत्येक माळेमध्ये वापरलेले मणी, लाकूड किंवा स्फटिकानुसार तिची स्वतःची ऊर्जा असते. अध्यात्मिक प्रगतीसाठी मंत्रोच्चार आणि ध्यान करताना जपमाळ वापरण्याची प्राचीन परंपरा आहे.
प्रत्येक जपमाळेचे स्पंदन वेगळे असते, जे आपल्या मनावर आणि शरीरावर विशिष्ट परिणाम करते. देवी-देवतांच्या उपासनेनुसार आणि ग्रहांच्या शांतीसाठी कोणती माळ वापरावी, याबद्दलची माहिती जाणून घेऊया.
डायमंड कट स्फटिक माळे हे समृद्धीचे प्रतीक असते. ही माळ विशेषतः पैलू पाडलेल्या स्फटिकांपासून बनलेली असते. हिऱ्याप्रमाणे चमकणाऱ्या या मण्यांमुळे नैसर्गिक ऊर्जा वाढते. ही माळ धारण केल्याने घरात समृद्धी येते आणि नातेसंबंधांमधील सुसंवाद वाढतो. मानसिक तणाव कमी करण्यासाठी ही अत्यंत गुणकारी मानली जाते.
तुळशीची जपमाळ ही भक्ती आणि पवित्रतेचे प्रतीक असते. भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाच्या उपासनेत तुळशीच्या माळेला सर्वोच्च स्थान आहे. तुळशीची माळ घातल्याने मनातील भीती दूर होते. तसेच आध्यात्मिक संरक्षण मिळते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारते आणि भक्तीभाव वाढतो, असे मानले जाते.
तपकिरी रुद्राक्ष माळ ही शक्ती आणि शिवभक्ती चे प्रतीक असते. रुद्राक्षाला भगवान शिवाचे अश्रू म्हटले जाते. रुद्राक्ष माळ धारण केल्याने रक्तदाब स्थिर राहतो आणि मानसिक स्थिरता मिळते. हे नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण देणारे एक कवच मानले जाते.
काळी रुद्राक्ष माळ ही संरक्षणाची ढाल मानली जाते. हा रुद्राक्षाचा गडद प्रकार असून तो अत्यंत तीव्र ऊर्जेसाठी ओळखला जातो. वाईट नजरेपासून वाचण्यासाठी आणि इच्छाशक्ती वाढवण्यासाठी ही माळ प्रभावी आहे. शनीच्या साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी अनेकजण ही माळ वापरतात.
तुम्ही तुमच्या गरजेनुसार मनःशांती असो वा आर्थिक समृद्धीसाठी योग्य माळ निवडू शकता. कोणत्याही माळेचा जप करताना तो पूर्ण श्रद्धेने आणि नियमांचे पालन करून केल्यास आध्यात्मिक लाभ नक्कीच मिळतो.